लोकसभा निवडणुकीचा बिगुल उद्या वाजणार; निवडणूक आयोगाची उद्या 3.00 वाजता पत्रकार परिषद!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 चे बिगुल उद्या वाजणार केंद्रीय निवडणूक आयोग उद्या दुपारी 3.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे ही लोकसभा निवडणूक पाच ते सात टप्प्यात होणे अपेक्षित असून 30 मे पर्यंत नवी लोकसभा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने वेळापत्रक आखले जाण्याची अपेक्षा आहे.Lok Sabha election trumpet will sound tomorrow; Election Commission press conference tomorrow at 3.00!!



निवडणूक आयोगाने यापूर्वी सर्व राज्यांचा दौरा करून तिथल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारकडे निमलष्करी दलाचे 350000 मनुष्यबळाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने या मागणीस आधीच मंजुरी दिली आहे. निवडणुका नि:पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभर 2500 निवडणूक निरीक्षक नेमले आहेत. दोनच दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राजधानीत बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, केंद्र सरकारने नेमलेले दोन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे यांनी आज निवडणूक आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. हे दोन्ही निवडणूक आयुक्त उद्याच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

Lok Sabha election trumpet will sound tomorrow; Election Commission press conference tomorrow at 3.00!!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात