विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना करीत आहे. ही लाट अधिक तीव्र असल्याने काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाउन करण्याचाही विचार सुरू आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्याम स्वामीनाथन यांनी लॉकडाउनचे परिणाम भयंकर असतील, असा इशारा दिला आहे. Lockdown is dangerous for country
तसेच कोरोनाची ही लाट नियंत्रित करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणासंदर्भातही त्यांनी भूमिका मांडली.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी विचार करण्यापूर्वी आणि पुरेशा प्रमाणात लसीकरण होण्यापर्यंत आपल्याला दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.
कोरोनाव्हायरसच्या साथीच्या अनेक लाटा येऊ शकतात. कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोस देण्यात ८ ते १२ आठवड्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस ‘डब्ल्यूएचओ’ने केली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या की लहान मुलांना लस देण्याचा सल्ला ‘डब्ल्यूएचओ’ने दिलेला नाही. मात्र दोन डोसमधील अंतर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढविता येऊ शकते.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App