वृत्तसंस्था
बीजिंग : चीनचे सर्वात मोठे शांघाय शहरात कोरोंना लॉकडाऊनमुळे दोन कोटी लोकांचे खण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शांघायमध्ये काटेकोर लॉकडाऊन लागू केला आहे. सुमारे २.६ कोटी नागरिक येथे राहत आहेत. त्यांनी घराबाहेर पडू नये, अशी सक्त सूचना दिल्या आहेत. एकीकडे अन्नपुरवठा आणि जीवनावश्यक वस्तू नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे भूक अशा दुहेरी कात्रीत नागरिक सापडले आहेत. Lockdown in Shanghai kills at home; two crore peopleare suffering from food shortage
केवळ सर्व सामान्य लोकच नाही तर अब्जाधीश सुध्दा दूध आणि पाव या सारख्या गोष्टीपासून वंचित आहेत. कारण अन्नपुरवठा बंद आहे. शांघायचे रहिवासी अन्नाच्या कमतरतेवर संतापले असून त्यांनी आणि कोविड लॉकडाऊनचा निषेध करण्यासाठी सुरुवात केली.
सुपरमार्केटमधून अन्न चोरीचे व्हिडिओ Weibo आणि WeChat सह विविध चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आले आहेत. हे व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. ते शांघायमधील अन्न संकटाचे द्योतक आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App