Lockdown in Delhi : राजधानी दिल्लीतील संसर्गाचा दर कमी होत असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हे लॉकडाऊन 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील. याकाळात दिल्लीतली मेट्रोसेवा बंदच राहणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली आहे. Lockdown in Delhi escalates by a week, announces Chief Minister Arvind Kejriwal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील संसर्गाचा दर कमी होत असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता हे लॉकडाऊन 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील. याकाळात दिल्लीतली मेट्रोसेवा बंदच राहणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली आहे.
दिल्लीचे लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्यात येत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, गेल्या 24 तासांत कोरोनाचे जवळपास 6,500 रुग्ण आढळले आहेत. सकारात्मकतेचा दर 1 टक्क्याने कमी होऊन 10 टक्क्यांच्या जवळ आला आहे.
We are extending the lockdown by one more week in Delhi: Delhi Chief Minister Arvind Kejriwal pic.twitter.com/WYrgyquUfZ — ANI (@ANI) May 16, 2021
We are extending the lockdown by one more week in Delhi: Delhi Chief Minister Arvind Kejriwal pic.twitter.com/WYrgyquUfZ
— ANI (@ANI) May 16, 2021
दरम्यान, दिल्लीतील दि. 17मेच्या पहाटे पाच वाजता लॉकडाउन संपुष्टात येणार होता. त्यापूर्वीच रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्याच्या सूचना दिल्या.
केजरीवाल म्हणाले की, लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिल्लीत दिसून येत आहे. 26 एप्रिलपासून नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या लॉकडाउनचा उपयोग आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि संसाधनांना बळकट करण्यासाठी केला गेला आहे. पुढील आठवड्यात आणखी चांगला परिणाम होईल अशी अपेक्षा आहे. निर्बंध पूर्वीसारखेच राहतील.
Lockdown in Delhi escalates by a week, announces Chief Minister Arvind Kejriwal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App