विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने २५ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १५ मेर्यंत लॉकडाउन राज्यात लागू केला होता. तसेच जम्मू आणि काश्मीयरमधील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीनर प्रशासनाने घेतला आहे. Lock down extended in Bihar and J and K
पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर बिहार सरकारने पाच मे ते १५ मेपर्यंत लॉकडाउन लागू केला होता. येत्या शनिवारी लॉकडाउनचा कालावधी संपत होता. आता पुढील दहा दिवसासाठी पुन्हा लॉकडाउन लागू केला आहे.
राज्यात आता रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. परंतु दररोज दहा हजाराच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या कारणामुळेच सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवला.
तत्पूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काल म्हटले की, लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण बिहारवासीयांचे सहकार्य आवश्येक आहे. आपण सर्व एकत्रितपणे कोरोना संसर्गावर मात करू, असा मला विश्वा स आहे.
काश्मी रमध्ये १७ मेपर्यंत लॉकडाउन दरम्यान, जम्मू आणि काश्मी्रमध्ये नव्या निर्णयानुसार २० जिल्ह्यात १७ मे पर्यंत संचारबंदी लागू असेल. गेल्या चोवीस तासात काश्मीवरमध्ये ४५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच विवाह कार्यक्रमासाठी लोकांची उपस्थिती ५० वरुन २५ वर आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App