पंतप्रधान मोदींना मागील ९ वर्षांत जगभरातील देशांनी प्रदान केलेले सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला माहीत आहेत का?

इजिप्तने नुकताच ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करत मोदींचा सन्मान केला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इजिप्त दौऱ्याच्या दुसरा दिवशी म्हणजे काल (रविवारी) त्यांना राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या हस्ते इजिप्तचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना जगभरातील विविध देशांकडून मिळालेला 13वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे. List of highest awards received by PM Modi from various countries in last 9 years

इजिप्तने 1915 मध्ये ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कारची सुरुवात केली होती. तेव्हा इजिप्तचे सुलतान हुसेन कामेलने यांनी याची स्थापना केली होती. 1953 मध्ये, राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि इजिप्त एक प्रजासत्ताक बनल्यानंतर, ऑर्डर ऑफ द नाईलची देशाचा सर्वोच्च सन्मान म्हणून पुनर्रचना करण्यात आली.

वास्तविक, इजिप्त किंवा मानवतेसाठी अमूल्य सेवा देणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना, राजपुत्रांना आणि उपराष्ट्रपतींना हा सन्मान दिला जातो. हे शुद्ध सोन्याच्या हारासारखे आहे. यात तीन चौरस सोन्याचे तुकडे आहेत. त्यावर पिरोजा आणि माणिक यांनी सजवलेल्या गोलाकार सोन्याच्या फुलांची तीन युनिट्स एकमेकांना जोडलेली आहेत.

या युनिट्सचे वेगवेगळे अर्थ आहेत. पहिले युनिट दुष्टांपासून राज्याचे रक्षण करण्याच्या कल्पनेसारखे आहे, दुसरे युनिट नाईलने आणलेल्या समृद्धी आणि आनंदासारखे आहे आणि तिसरे युनिट संपत्ती आणि तग धरण्याची क्षमता दर्शवते. यात एक षटकोनी लटकन आहे, जे फारोनिक शैलीतील फुले, नीलमणी आणि माणिक रत्नांनी सजवलेले आहे.

देशांतर्गत राजकारणात मोदी विरोधातले 15 विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकापाठोपाठ एक सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त होत आहेत. मागील 9 वर्षात जगातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

या निमित्त आता पाहूयात मागील ९ वर्षांमध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना कोणता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे –

– मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीने ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ पुरस्कार दिला.

– मे 2023 मध्ये फिजीने ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर फिजी’ ने सन्मानित करण्यात आले.

– मे 2023 मध्ये, पलाऊ रिपब्लिकने मोदींना ‘एबाकल अवार्ड बाई द रिपब्लिक ऑफ पलाऊ’  पुरस्कार देऊन सन्मानित केले.

–  डिसेंबर 2021 मध्ये भूतानने ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्प’ पुरस्कार दिला.

– 2020 मध्ये, यूएस सरकारने ‘लिजन ऑफ मेरिट’ हा पुरस्कार दिला.

-2019 मध्ये बहरीनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसेंस’ हा पुरस्कार दिला.

-2019 मध्ये मालदिवने ‘ऑर्डर ऑफ द डिस्टिंगिश रूल ऑफ निशान इज्जुद्दीन’ पुरस्कार देण्यात आला.

-2019 मध्ये रशियाने ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू अवॉर्ड’ दिला.

– 2019 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीने ‘ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार’ प्रदान केला.

-2018 मध्ये पॅलेस्टाईनने त्यांना ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

-2016 मध्ये अफगाणिस्तानने ‘स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान’ हा पुरस्कार दिला.

2016 मध्ये सौदी अरेबियाने ‘ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद’ हा पुरस्कार दिला.

एकीकडे देशातले मोदी विरोधक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याच्या कल्पनेने पछाडले आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधी ऐक्याचा प्रयत्न चालवला आहे. देशात लोकशाही नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. मुस्लिम असुरक्षित आहेत. अल्पसंख्यांक, दलित यांच्यावर अत्याचार होत आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात विरोधकांची चढाओढ लागली आहे. पण त्याच वेळी मोदींना मात्र एकापाठोपाठ एक असे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळत आहेत. “ऑर्डर ऑफ द नाईल” हा त्यांना मिळालेला 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

List of highest awards received by PM Modi from various countries in last 9 years

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात