विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एलआयसीचा आयपीओ येणार असल्यामुळे एक कोटी डिमॅट खाती उघडण्याची शक्यता वाढली आहे. LIC’s IPO is coming; Possibility to open one crore demat accounts
भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलाआयसीचा आयपीओ शेअर बाजारात लवकरच लॉंच होणार आहे. त्यामुळे एलआयसीने आपल्या विमाधारकाना आयपीओ खरेदी करण्यासाठी पॅन नंबर हा पॉलिसीशी जोडण्यास सांगितले.
२५ कोटींहून विमाधारक एलाआयसीचे आहेत. त्यांना आयपीओ खास कोट्यातून खरेदीची संधी एलआयसी देणार आहे. पर्यायाने डिमॅट खात्यात १ कोटीने भर पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अर्थात हे सर्व केल्यावर आयपीओ मिळेलच याची खात्री देता येणार नाही. परंतु एक सुविधा म्हणून पॅन लिंकचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षात ३ कोटींपेक्षा जास्त डिमॅट खाती नागरिकांनी शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी अगोदरच उघडली आहेत. त्यात आता १ कोटी खात्यांची भर पडणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App