ताजमहाल की तेजोमहालय?? : भारतीय पुरातत्व विभागाला ताजमहलाचे 22 दरवाजे उघडू द्या; अलाहाबाद हायकोर्टात याचिका!!

वृत्तसंस्था

आग्रा : ताजमहाल की तेजोमहालय??, या वादात आता आर्किऑलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया अर्थात भारतीय पुरातत्व विभागाचे महत्त्व वाढले आहे. कारण ताजमहालाचे 22 दरवाजे उघडून द्या. तेथे पुरातत्व विभागाला सर्वेक्षण करू द्या, अशी मागणी करणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली आहे. Let the Archaeological Survey of India open the 22 doors of the Taj Mahal

याबाबत हायकोर्टाने निर्णय दिला नसला तरी याचिकाकर्त्याने ताजमहालच्या पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावरील 23 खोल्यांमध्ये हिंदु चिन्हे तसेच हिंदू देवी देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला आहे. यासाठी याचिकाकर्त्याने इतिहासकार पुरूषोत्तम नागेश ओक यांच्या पुस्तकाचा हवाला दिला आहे. पु. ना. ओक यांनी ताजमहाल हा तेजोमहालय आहे, असा दावा करणारे पुस्तक लिहिले आहे.


प्रति ताजमहाल! बुरहानपूर मधील नागरिकाने आपल्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून ताजमहल सारखेच दिसणारे घर बांधले


याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार जर अलाहाबाद हायकोर्टाने भारतीय पुरातत्व खात्याला ताजमहाल मध्ये जाऊन 22 खोल्यांचे दरवाजे उघडण्याची परवानगी दिली आणि तेथील सर्वेक्षण करून दिले तर या विषयातले सत्य बाहेर येणार आहे.

सध्या काशी मधील ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षणाचा वाद कोर्टात आहे. मशिदीच्या सर्वेक्षणात मुस्लिम पक्षाने आडकाठी केली आहे. उद्या पुन्हा एकदा ज्ञानवापी मशिदी सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ताजमहाल मधील 22 खोल्यांचे सर्वेक्षण होणार का??, भारतीय पुरातत्त्व खात्याची परवानगी मिळणार का?? याविषयी अलाहाबाद हायकोर्टात निर्णय होणे अपेक्षित आहे.

Let the Archaeological Survey of India open the 22 doors of the Taj Mahal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात