विशेष प्रतिनिधी
बदलापूर : कर्जत मार्गावरील गोरेगाव भागात तीन दिवसांपूर्वी रात्री पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या बछड्याचे डोके प्लास्टिकच्या पाण्याच्या जारमध्ये अडकल्याची घटना घडली होती. त्यामुळे डोक्यात जार घेऊन बिबट्याच्या बछडा फिरत होता. अखेर त्याची सुटका या संकटातून झाली आहे. leopard got stuck in the water jar head; Life saving from animal friends
कारमधून प्रवास करताना काही प्रवाशांना हा बिबट्या दिसला. त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करत याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना दिली होती व्हिडिओच्या आधारे या बिबट्याचा शोध वनअधिकारी व पॉज या प्राणी मित्र संस्थेच्या मदतीने सुरू केला होता. अखेर ३ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर बदलापूर जवळील गोरेगाव येथील जंगल भागातून त्याला पकडण्यात आले.
प्राणीमित्र संघटनेचे भूषण पवार, निलेश भणगे, नवीन साळवे, ऋश्रीकेश सुरसे, देवेंद्र निखले या सर्वांनी बिबट्याच्या डोक्याला अडकलेले प्लास्टिक जार कापून त्याची सुखरूप सुटका केली. विशेष म्हणजे, परवा रात्रीपासून या बिबट्याच्या डोक्यात जार अडकल्याने तो उपाशी आणि तहानलेला होता. त्यामुळे, त्याच्यावर घटनास्थळी जंगलातच उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नेणार असल्याचे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App