राऊत – सोमय्याच्या एकमेकांवर तोफा; तर राजू शेट्टींच्या जयंत पाटील – काँग्रेसवर फैरी!!


  • जलविद्युत प्रकल्पांच्या खाजगीकरणात जयंत पाटलांचा घोटाळा; राजू शेट्टींचा आरोप; भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात राहुल गांधीना पत्र!! 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे घमासान सुरू असताना तसेच मराठी माध्यमांचे सर्व लक्ष त्यावर केंद्रित झाले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर दोन वेगवेगळ्या घोटाळ्यांचा आरोप केला आहे. Raut – Somaiya’s guns on each other; Raju Shetty’s Jayant Patil – Fairy on Congress !!

महाराष्ट्रातील 27 जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कारस्थान आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जाऊन महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार भूमी अधिग्रहण कायदा बदलत असल्याचाही आरोप राजू शेट्टी यांनी करून या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे.– जयंत पाटलांवर आरोप

महाराष्ट्रात जलविद्युत प्रकल्पांमध्ये एक रुपया युनिट या दराने वीज तयार होते तरीदेखील महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार खासगी कंपन्यांकडून 4 ते 5 रुपये युनिट या दराने वीज विकत घेऊन ती ग्राहकांना देते. ग्राहकांवर तर याचा बोजा पडतो. परंतु, यातून 27 जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आखला आहे. 25000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा हा महाघोटाळा आहे. याला तेच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. जलविद्युत प्रकल्प खरेदी करणाऱ्या खाजगी कंपन्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांच्या आहेत.

सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करून त्यांनी जसा घोटाळा केला तसाच घोटाळा जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण यातही दिसून येतो, असे राजू शेट्टी म्हणाले. येत्या 18 फेब्रुवारी रोजी उद्या या भ्रष्टाचाराविरोधात सांगलीत मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

– भूमी अधिग्रहण कायदा विरोधात राहुल गांधींना पत्र

याखेरीज राजू शेट्टी यांनी आज राहुल गांधी यांना भूमी अधिग्रहण कायदा बदलण्या संदर्भात पत्र लिहिले असून 2015 मध्ये मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायदा बदलण्याचा प्रयत्न केल्यावर काँग्रेसने त्याला विरोध केला होता. मात्र काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात राज्य करत असलेले महाविकास आघाडी सरकार देखील भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी हिताच्या विरोधात जाऊन बदलत आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे तरी देखील काँग्रेस या पापामध्ये सहभागी आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी या पत्रात केला आहे.

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या आरोपपत्र आरोप-प्रत्यारोपांच्या घमासान आकडे सर्व प्रसार माध्यमांचे लक्ष लागलेली असताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांवर थेट भ्रष्टाचाराचा, महाघोटाळ्याचा आरोप करून नवी खळबळ उडवून दिली आहे.

Raut – Somaiya’s guns on each other; Raju Shetty’s Jayant Patil – Fairy on Congress !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण