येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी अनेक रेकॉर्ड बनवताना दिसणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : थलपति विजयचा ‘लिओ’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर सोशल मीडियावर तुफान गाजत आहेत. याआधी क्वचितच कुठलाही तमिळ चित्रपट बनला असेल जो प्रदर्शित होण्याअगोदरच थलपथी विजयच्या ‘लिओ’ इतका गाजला असेल. Leo breaks Shahrukhs Pathan record On the very first day reached the magical number
चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच असा अंदाज वर्तवला जात होता की, लोकेश कनागराज दिग्दर्शित हा चित्रपट इतिहास रचेल आणि कोणत्याही तमिळ चित्रपटाच्या तुलनेत सर्वाधिक ओपनिंग असलेला चित्रपट बनेल. नेमकं तेच झालं. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जगभरात १०० कोटींचा जादुई आकडा पार केला आहे.
थलपति विजयच्या ‘लिओ’ चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये सुरुवातीच्या अंदाजानुसार 63.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण कमाईचे आकडे बघितले तर चित्रपटाने 74 कोटींची कमाई केली आहे. बंपर कमाई करतानाच या चित्रपटाने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा विक्रमही मोडला आहे. ‘लिओ’ने परदेशात 66 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार हा चित्रपट जगभरात लोकप्रिय झाला असून इतिहास रचत या चित्रपटाने 140 कोटींची ग्रँड ओपनिंग केली आहे. यावरून या चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाहत्यांना चित्रपट आवडला आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी अनेक रेकॉर्ड बनवताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App