विशेष प्रतिनिधी
पुणे : क्रूझ ड्रग प्रकरणानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. याच प्रकरणामध्ये नुकताच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांची न्यायालयीन कोठडी मध्ये वाढ झाली आहे. आज शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीच्या टीमने छापा टाकला होता. तसेच अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी देखील छापा टाकण्यात आला होता.
Legal notice to be sent to Nawab Malik: NCB chief Sameer Wankhede
या सर्व पाश्र्वभूमीवर दैनिक भास्करने दिलेल्या वृत्यानुसार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बरेच सणसणीत आरोप समीर वानखेडे आणि भाजप वर केले आहेत. मलिक म्हणतात, एनसीबी खोट्या केसेस दाखल करत असून या सर्व गोष्टींमधून हजारो कोटींची वसुलीचा व्यवसाय करण्याचे धोरण एनसीबीचे आहे. असा आरोप मलिक यांनी केला आहे. आणि हा घोटाळा उघडकीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. समीर वानखेडे यांना एका वर्षाच्या आत जेल मध्ये पाठवू. असा इशारादेखील नवाब मलिक यांनी यावेळी दिला आहे.
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना मुदतवाढ ; आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी
या केसच्या सुरूवातीपासूनच नवाब मलिक यांनी बॉलीवूड, महाराष्ट्र आघाडी सरकार यांना जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे असा आरोप केला होता. या पाश्र्वभूमीवर त्यांनी समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे हिचा दुबईमधील एक फोटो शेअर करत असा आरोप केला आहे की, जेव्हा कोरोना काळामध्ये सर्व सेलिब्रिटी मालदीव आणि दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते. त्यावेळी समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय देखील तिथे सुट्ट्यांसाठी गेले होते. तिथे नेमके काय करत होते? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पिंपरी चिंचवड येथे बोलताना नवाब मलिक पुढे म्हणाले, समीर वानखेडे यांची वर्षभरात नोकरी जाईल. कारण तो किती बोगस माणूस आहे याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. आणि हे सर्व पुरावे आम्ही बाहेर काढणारच. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरून दबाव होता. पण आता नबाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. असा इशारा नवाब मलिक यांनी यावेळी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही आरोप करताना म्हटले होते, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल. देवेंद्र फडणवीसांच्या या धमकीला पोकळ धमकी म्हणत महाविकास आघाडी सरकार हे घाबरणारे सरकार नाही. तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला आहे.
या सर्व आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, नवाब मलिक हे साफ खोटे बोलत आहेत. मी आयुष्यात कधी दुबईला गेलेलो नाहीये. त्यामुळे नवाब मलिक यांनी आपले कार्टुन नेटवर्क चालवणे बंद करावे. लवकरच त्यांना एक कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App