विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळवण्याचा कायदा करावा, या मागणीसाठी दिल्लीची कोंडी करण्याचे आंदोलन शेतकऱ्यांनी चालवले आहे. हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर जमा झाले आहेत.Last time Modi left Punjab safely, but this time…; The language of threats in farmers’ movement!!
पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधून लाखो शेतकरी दिल्लीकडे येत आहेत. त्यामुळे दिल्लीत अराजकाचे वातावरण आहे. पण हे आंदोलन फक्त किमान आधारभूत किंमत मिळवण्याच्या कायद्यासाठी आहे की त्याचे अन्य राजकीय हेतू आहेत??, याविषयी दाट शंका निर्माण झाली असून शेतकरी आंदोलनातूनच आता वेगवेगळ्या धमक्यांची भाषा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यावेळी पंजाब मधून सुरक्षित निघून जाऊ शकले. पण यावेळी ते पंजाब मध्ये आले, तर सुरक्षित राहणार नाहीत, अशी धमकी धमकीची भाषा एका शेतकरी आंदोलने वापरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळेच शेतकरी आंदोलकांचा मूळ हेतू केवळ शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळवून देण्याचा आहे की फुटीरतावादी आहे??, याविषयी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
https://twitter.com/AshokShrivasta6/status/1757633420367167814
गेल्या वेळेच्या शेतकरी आंदोलनात फुटीरतावादी घटक घुसले. लाल किल्ल्यावर खलिस्तानचे झेंडे फडकवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे शेतकरी आंदोलन बदनाम झाले. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले, तरी शेतकरी आंदोलनातल्या म्होरक्यांचे हेतू लपून राहिले नाहीत. आता तर नव्या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्याच तोंडून थेट पंतप्रधान मोदींना धोका पोहोचवण्याची धमकीची भाषा समोर आल्याने शेतकरी आंदोलनाच्या सुरुवातीलाच त्यांच्या हेतूंविषयी दाट शंका निर्माण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App