Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!


लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढ

विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली : लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढत आहेत. आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सोमवारी (3 जुलै) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात नोकरीसाठी जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि कंपन्यांसह इतर अनेकांची नावे आरोपी म्हणून आहेत. Land for Job Scam Chargesheet filed by CBI against Tejashwi Yadav

राऊस अॅव्हेन्यू कोर्ट आता १२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सीबीआयने नोकरीसाठी जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि इतर अनेकांविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.

CBIने कोर्टात काय म्हटले? –

सीबीआयने न्यायालयात सांगितले की, आरोपपत्र दाखल करूनही या प्रकरणात नवीन आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, कारण कथित प्रकरण वेगळ्या पद्धतीने केले गेले आहे. लालू आणि इतर तिघांविरोधातील मंजुरीची प्रतीक्षा आहे, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

आरोपपत्रात तेजस्वी यादव यांचे नाव आल्यावर आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, तेजस्वी यादव यांनी स्वतःचे नाव चार्जशीटमध्ये येणार असल्याचे सांगितले होते. सध्या ज्या प्रकारचे वातावरण आहे आणि भाजपा ज्या प्रकारचे राजकारण करत आहे, त्यामध्ये हेच होणारवे होते, पण आपल्या राजकारणात काहीही बदल होणार नाही. देशाला हिंदू राष्ट्र होण्यापासून रोखण्यासाठी जो काही त्याग करावा लागेल त्यासाठी आम्ही तयार आहोत.

Land for Job Scam Chargesheet filed by CBI against Tejashwi Yadav

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात