राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातल्या शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ या वादात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या बाजूने त्यांच्या गटाचे समर्थक जरूर उभे राहिले, पण राष्ट्रवादीच्या फुटीमुळे मराठी माध्यमांनी योद्धा चाणक्य मैदानात उतरल्याचे जे बहारदार वर्णन केले, तेवढी पवारांविषयी सहानुभूती निर्माण महाराष्ट्रात निर्माण झाल्याची चिन्हे दिसत नाहीत. Sharad Pawar must have the support of his group in the struggle
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यातून ही बाब अधोरेखित झाली. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले नसते तर अजित पवारांनी बंडखोरी केली नसती असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले, तर राष्ट्रवादीतली फूट अनपेक्षित नव्हती. ती अपेक्षित होती. किंबहुना पवारांनाही राष्ट्रवादीत फूट पडणार हे माहिती होते. शरद पवारांनी अजित पवारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवारांचा कल सत्तेकडे होता. त्यांना शिंदे – फडणवीस यांच्याबरोबर जायचेच होते. म्हणून ते गेले, असे परखड वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा विशिष्ट दृष्टिकोन जरी द्रुवचर होत असला तरी तो केवळ काँग्रेसचा राजकीय दृष्टिकोन म्हणून दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. उलट या दोन्ही नेत्यांची परखड मते वास्तवाकडेच अंगुली निर्देश करतात हे मान्य करावे लागेल.
पण त्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादीतल्या फुटीचा विचार केला, तर पवारांना त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे त्यांच्या गटाचे समर्थन निश्चित मिळाले आहे, पण राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे पवारांविषयी कोठे फार मोठी सहानुभूती निर्माण झालेली मात्र दिसत नाही.
… आणि त्याची कारणेही पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय इतिहासात उघड दिसत आहेत. पवारांनी आत्तापर्यंत काँग्रेस किमान दोनदा फोडली. आधी समाजवादी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस काढली, पण स्वतःसाठी राजकीय सत्ता मिळवण्याची वाट चोखाळण्यासाठी पुन्हा मूळ काँग्रेसचाच सहारा घेतला. पवारांनीच शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष फोडले. 1992 मध्ये छगन भुजबळांसह शिवसेनेचे 18 आमदार फोडले. मुंडे – खडसे ही भाजपनिष्ठ घराणी फोडली. त्यामुळे पवारांचा मूळ राजकीय इतिहासच इतर पक्षांची फोडाफोडी करून स्वतःचा पक्ष बळकट करण्याची राहिला आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.
त्यामुळे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटली असताना शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर आहे, पण राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे शरद पवारांविषयी सहानुभूती निर्माण झाल्याचे चित्र महाराष्ट्रात बिलकुल तयार झालेले नाही. उलट पवारांचेच फोडाफोडीचे राजकारण त्यांच्यावर अखेरीस उलटले, अशीच अनेकांची भावना आहे. पवारांनी जे पेरले तेच उगवले, अशी मते अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
शरद पवारांचा महाराष्ट्रातला एक समर्थक गट त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून होता आणि आहे. त्यात दोन-तीन पिढ्यांनी पवारांचे समर्थन केले, अशीही अनेक उदाहरणे आहेत. पण त्याच वेळी पवारांनी त्यांच्या समर्थकांना जी सत्तेच्या राजकारणाची सवय लावली, त्यातून अनेकांना सत्तेची चटक लागली. त्या चटकेचे रूपांतर सत्तेच्या व्यसनात झाले आणि त्यातून आज राष्ट्रवादी फुटली.
पूर्वी शरद पवार काँग्रेसच्या वळचणीला राहून सत्तेचा वाटा उपभोगत असत. आज काँग्रेसची वळचणच एवढी छोटी झाली आहे, की पवारनिष्ठ असोत किंवा पवार विरोधक असोत काँग्रेस कोणालाच सत्तेची वळचण देऊ शकत नाही. ती सत्तेची वळचण आज भाजपकडे उपलब्ध आहे. आता फक्त भाजपकडेच ही सत्तेची वळचण उपलब्ध असेल, तर पवारांनीच सत्तेचे संस्कार केलेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पवारांचाच पक्ष फोडून भाजपची घरोबा केला असेल आणि भाजपच्या वळचळणीला जाऊन ते सत्तेचा वाटा मिळवत असतील, तर त्यांना पवार कोणत्या तोंडाने बोल लावणार??, हा बोचरा सवाल अनेकजण विचारत आहेत.
त्यामुळेच शरद पवारांना राष्ट्रवादीतल्या फुटी नंतर त्यांच्या गटाचे समर्थन जरूर आहे, पवारांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला समर्थकांचा प्रतिसादही जोरात मिळेल, पण पवारांच्याच फोडाफोडीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांविषयी महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट कितपत तयार होईल??, याविषयी शंका वाटते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more