विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रयागराज मध्ये होत असलेला महा कुंभमेळा हा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर असल्याचा अजब दावा ऑल इंडिया मुस्लिम जमातचे प्रमुख मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी केला, पण विश्व हिंदू परिषदेने मौलानांना चोख प्रत्यय उत्तर दिले.Kumbh Mela on Waqf Board land in Prayag, Maulana Shahabuddin Barelvi’s claim; But the exact reply of the Vishwa Hindu Parishad!!
प्रयागराज मध्ये महा कुंभमेळा होत आहे. त्यासाठी 40 कोटी हिंदूंची व्यवस्था यानिमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आणि वेगवेगळ्या साधूंच्या आखाड्यांनी केली आहे. मात्र काही आखाड्यांनी यामध्ये मुस्लिमांना प्रवेशाची परवानगी नाकारली आहे. तो त्यांच्या धार्मिक आस्थेचा भाग आहे, पण आता त्या मुद्द्यावर चिडून ऑल इंडिया मुस्लिम जमातचे प्रमुख मौलाना शहाबुद्दिन रजवी बरेलवी यांनी एक अजब दावा करून टाकला. मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाच्या 55 बिघे जमिनीवर महा कुंभमेळ्यातले तंबू लागले आहेत. ही जमीन मुस्लिमांनी हिंदूंना वापरायला परवानगी दिली आहे. मुस्लिमांनी मोठे मन दाखवले आहे, असा दावा मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी केला.
@BJP4India aise hi time pass krti rahegi aur election se pehle Hindu ko yaad karegi. — Aditya (@ADITYAS16129242) January 5, 2025
@BJP4India aise hi time pass krti rahegi aur election se pehle Hindu ko yaad karegi.
— Aditya (@ADITYAS16129242) January 5, 2025
मात्र या दाव्यावर विश्व हिंदू परिषदेचे मुख्य प्रवक्ते विनोद बन्सल यांनीच प्रत्युत्तर दिले. इस्लाम अस्तित्वात येण्यापूर्वीपासून प्रयागराज मध्ये महा कुंभमेळा आयोजित केला जात आहे. त्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा काहीही संबंध नाही. मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी धादांत खोटं बोलत असून ते मोहम्मद अली जिना यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. मोहम्मद अली जिना यांनी लडके लेंगे पाकिस्तान हसके लेंगे हिंदुस्तान, अशी घोषणा दिली होती. तसेच मौलाना शहाबुद्दीन रजबी बरेली यांना करायचे आहे, पण त्यांचे गजवा ए हिंदचे स्वप्न हवेतच राहणार आहे, असं तडाखा विनोद बन्सल यांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App