Manipur : मणिपुरात शस्त्रसज्ज टोळ्या शरण यायला सुरुवात, 16 पैकी एका जिल्ह्यात संघर्ष

Manipur

वृत्तसंस्था

इंफाळ : Manipur मणिपूरमध्ये लष्कर, बीएसएफ आणि सुरक्षा दलांचे ऑपरेशन क्लीनचा परिणाम दिसत आहे. राज्यातील १६ पैकी १५ प्रशासकीय जिल्ह्यांत शांतता आहे. मैतेईबहुल पाच जिल्ह्यांत आता शस्त्रसज्ज टोळ्या शरण येत आहेत. कुकीबहुल चार जिल्ह्यांतही सुरक्षा दलांना अडचण येत नाही. या भागांत सरकारी कार्यालये आणि शाळांतील हजेरी १०० टक्के आहे.Manipur

मात्र, एक कुकी जिल्हा कांग्पोक्पीमध्ये स्थिती आव्हानात्मक आहे. येथे गेल्या ३ दिवसांपासून आदिवासी गट आणि बीएसएफ यांच्यात संघर्ष सुरू आहे. आदिवासी गट बीएसएफला सीमेत घुसू दिले जात नाही. कुकी आदिवासी संघटना कमेटी ऑन ट्रायबल युनिटी(कोटू) केंद्रीय सुरक्षा दलांना विरोध करत आहे. त्याचे प्रवक्ते कामिनलेन यांच्यानुसार, आमच्या ६० महिन्यांना बीएसएफने मारहाण केली. एका महिलेने डोळा गमावला. मणिपूर सरकारच्या निर्देशावर सायबोल भागात बीएसएफ तैनात केले जात आहे.



फक्त 9×9 चौ.फुटांच्या खोलीत संपूर्ण कुटुंब

मणिपूर हिंसाचारात ६० हजारांहून जास्त लोक अद्यापही घरी परतण्याची प्रतीक्षा करत आहेत. हे असे लोक आहेत, ज्यांची घरे जळाली आहेत. यापैकी सुमारे ३ हजार लोकांना नुकतेच मदत छावण्यांतून काढून प्री-फॅब्रिकेटेड हाऊस(छोट्या घरांत) शिफ्ट केले आहे. मात्र, या छोट्या खोल्यांची स्थिती मदत छावण्यांपेक्षाही वाईट आहे. हे लोक २५२० घरांत राहत आहेत, जे लेटबाथची ९ बाय ९ बाय फुटाचा एक खोली आहे. प्रत्येक खोलीत कमीत कमी ३ लाेक राहतात. किचनही हेच आहे. येथे रोज दरडोई फक्त ८० रु. निर्वाह भत्ता सरकार देते. एका कुटुंबाला फक्त ४०० ग्रॅम तांदूळ मिळतो. हेही त्यांना आठवड्यात ३-४ दिवसच मिळतो. भास्कर टीम येथे पोहोचल्यानंतर काही खोल्यांत ६-६ लोक राहत असल्याचे दिसले. मात्र, विविध अडचणीनंतरही या लोकांना याचा आनंद आहे की, त्यांच्याकडे प्रायव्हसी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी अडोसा आहे.

ईडीचे आरोपपत्र : अनेक आमदार-नेत्यांचे समाजकंटकांना फंडिंग

मणिपूर हिंसाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला(ईडी) माहीत झाले आहे की, राज्यातील आमदार, नेत्यांनी कट्टरपंथीय संघटना यूनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटला फंडिंग हिंसाचार भडकवण्यासाठी केला. ईडीने नुकतेच या संदर्भात एक आरोपपत्र एनआयए कोर्टात दाखल केले आहे. एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर भास्करला सांगितले की, कट्टरपंथी संघटनने त्यांनाही पैसे मागितले होते, मात्र त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. गेल्या वर्षी यूएनएलएफच्या दोन केडर्सना पकडले होते.

Armed gangs start surrendering in Manipur, clashes in one of 16 districts

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात