क्रीडा प्रतिनिधी
चेन्नई : कोलकाता नाईट रायडर्सने IPL-2024 चे विजेतेपद पटकावले आहे. संघाने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. कोलकाता संघ तिसऱ्यांदा या लीगमध्ये चॅम्पियन बनला आहे. या संघाने तब्बल 10 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळी कोलकाता 2014 मध्ये चॅम्पियन झाला होता. Kolkata win third IPL KKR champions after 10 years SRH lost by 8 wickets
रविवारी चेपॉक मैदानावर हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या. कोलकाताने 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. रहमानउल्ला गुरबाजने 32 चेंडूत 39 धावा केल्या. आंद्रे रसेलने गोलंदाजीत 3 बळी घेतले.
IPLवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका : सरन्यायाधीश म्हणाले- आम्ही सुनावणी करणार नाही
टीम इंडियात परतण्यासाठी अय्यरला होईल फायदा
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 वर कोरले आहे. चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेटने दारुण पराभव केला. श्रेयस अय्यर याचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. अय्यरसाठी हा विजय खूप महत्वाचा आहे, कारण त्याला टीम इंडियात परत येण्यासाठी फायदा होईल. कोलकात्यानं आयपीएल 2024 मध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवलं, यामध्ये कॅप्टन अय्यरचा सिंहाचा वाटा होता. पण अय्यरसाठी हे सोपं नव्हतं, कारण 2023 विश्वचषकात शानदार खेळल्यानंतरही त्याचा टीम इंडियातून पत्ता कट झाला होता.
आयपीएल फायनलपूर्वी झालेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यानं आपल्याला झालेल्या दुखापतीबाबत सांगितले. मला पाठदुखी झाली होती, असं तो म्हणाला. टीम इंडियातून वगळण्यात आलं. करारातून वगळले, तरीही अय्यर मानसिकदृष्ट्या सक्षम राहिला. त्यानं आयपीएलच्या मैदानात शानदार कमबॅक केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकात्यानं चषकावर ना कोरले. गौतम गंभीर आणि चंदू पंडीत यांच्या इतकेच कोलकात्याच्या विजयात अय्यरचे योगदान आहे.
यंदाच्या हंगामात अय्यरची कामगिरी
श्रेयस अय्यर याने 14 सामन्यात 351 धावा चोपल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 58 इतकी राहिली.त्याने 146.86 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. अय्यरने दोन अर्धशतके ठोकली. त्याने 34 चौकार आणि 14षटकार लगावले. अय्यर 5 वेळा नाबाद राहिलाय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App