विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका भिन्न झाल्या त्यामुळे पक्षांमध्ये फूट पडून दोन वेगवेगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाले तरी देखील पवार कुटुंबामध्ये खूप पडली नसल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी आधी घेतली होती परंतु त्यांच्या भूमिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी छेद देत पवार कुटुंबामध्ये फूट पडल्याचीच कबुली दिली. Rohit Pawar confession of a split in the Pawar family
बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या घरातच लढत झाली. मूळ पवार घरातली मुलगी मुलगी विरुद्ध बाहेरून आलेली पवारांची सून असे या लढतीचे स्वरूप स्वतः शरद पवारांनी वर्णन केले या पार्श्वभूमीवर लेट्स अप मराठीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला छेद देणारे वक्तव्य केले. पवार कुटुंबात राजकीय फूट आहे. राजकीय विरोध आहे. अगदी राजकीय हमरीतुमरी आहे. पण कुटुंबात फूट पडलेली नाही, या वक्तव्यात विरोधाभास तुम्हाला वाटत नाही का??, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, मला पण ते वाक्य कळत नाही, ते मला योग्यही वाटत नाही. जर विचारामध्ये भिन्नता असेल, राजकीय दृष्टीकोन नाहीतर काही असो भिन्नता आहे. विषय संपला. त्यामुळे दोन्ही बाजू असू शकत नाही. एकच बाजू असेल, असे मला वाटते.
दुटप्पी भूमिका चालणार नाही
माझे एकच मत आहे, राजकीय दृष्टीकोनातून तुम्ही खालच्या लेव्हलला जावून कुटुंबातीलच एका व्यक्तीबद्दल आणि नेत्याबद्दल जर तुम्ही बोलत असाल, तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट राहिलेला नाही. मग घर आणि राजकारण वेगळं अशी दुटप्पी भूमिका कुटुंबातही आणि राजकारणतही चालत नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवारांनी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर अनेकदा निशाणा साधला होता. दोन वेगळे पक्ष झालेले आहेत. तसेच पवार कुटुंब फुटलेले आहे, असे थेट भाष्यही अजित पवारांनी एका सभेत केले होते. रोहित पवारांच्या वक्तव्यातून अजित पवारांच्या भूमिकेला पुष्टी मिळाली. त्या उलट कुटुंबात फूट नसल्याच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला छेद मिळाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more