वृत्तसंस्था
कोलकाताच्या ( Kolkata ) आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली.सीबीआयचा आतापर्यंतचा तपास आणि मृत डॉक्टरच्या सहाध्यायींच्या जबाबानुसार मानवी अवयव तस्करीचा भंडाफोड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या डॉक्टरला मार्गातून हटवण्यात आले. सीबीआयने शनिवारी १३ जणांची चौकशी केली. दोन दिवसांत १९ जणांची चौकशी झाली आहे. यातील निम्म्याहून जास्त लोकांनी तस्करीच्या रॅकेटबद्दलची माहिती दिली. लवकरच खरे चेहरे समोर येतील, असे सीबीआयचे म्हणणे आहे.
सूत्रांनी सांगितले की, प्रकरणाची पाळेमुळे खोलवर आहेत. ही घटना सामान्य वाटावी म्हणून अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर ओळखले जाण्याच्या भीतीने हत्या केल्यासारखे वाटावे. प्राथमिक तपासात पोलिस याच दिशेने जात होते. एका राजकीय नेत्याने रुग्णालयातील डॉक्टरांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संभाषणाचा स्क्रीनशॉट असल्याचा दावा केला. त्यात सेक्स, ड्रग रॅकेट असल्याचे दिसते. यात एका अन्य पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या पुतण्याचा उल्लेख आहे. आतापर्यंतच्या चौकशीत मेडिकल कॉलेजच्या चार जणांची नावे समोर आली आहेत. यात तीन डॉक्टर आहेत. एक कर्मचारी आहे. हे चारही जण एका राजकीय पक्षाशी जोडलेले असून ते सेक्स, ड्रग्ज रॅकेट चालवत होते. मृत डॉक्टरचे वडील बांगला मीडियाला म्हणाले, संपूर्ण विभाग यात सामील आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सेमिनार कक्षात आणून ठेवला असावा, असा संशय आहे.
कोलकाता पोलिसांचा दावा
कोलकाता पोलिसातील एक अधिकारी म्हणाले, प्राथमिक तपासात एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते व एका नेत्याच्या मुलाचे नाव यात आले होते. परंतु पुराव्याअभावी संशयाच्या कक्षेतून ते वगळण्यात आले. कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल पत्रकारांना म्हणाले, एखाद्या गोष्टीच्या आधारे, परंतु विनापुरावा एखाद्याला अटक करता येत नाही.
बंगालचा आदेश महिला १२ तासांवर काम करणार नाहीत
अटॅच टॉयलेटचा स्वतंत्र कक्ष असला पाहिजे, असे राज्याच्या आदेशात म्हटले आहे. महिलांनी टीम किंवा किमान दोन सहकाऱ्यांसोबत काम करावे. वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, महिलांचे वसतिगृह इत्यादी ठिकाणी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालणे अनिवार्य असेल. महिला डॉक्टरांनी एका दिवसात बारा तासांपेक्षा जास्त तास काम करता कामा नये. सिक्युरिटी गार्डमध्ये महिला तसेच पुरुष असे दोन्ही तैनात केले जातील.
महिला डॉक्टर रॅकेटचा पर्दाफाश करण्याची योजना आखत होती…
रुग्णालयातील एका डॉक्टरांनी दावा केला की, पीडितेने आरोग्य भवन येथे तक्रार केली होती. परंतु आरोपी शक्तिशाली असल्यामुळे कारवाई झाली नाही. म्हणून पुराव्यासह महिला डॉक्टर ते सोशल मीडियातून चव्हाट्यावर आणणार होती. अलीकडेच रुग्णालयात वैद्यकीय कचऱ्याच्या निपटाऱ्यासाठी आणि काही आैषधी-सामान पुरवठ्याची निविदा मागवण्यात आली होती. हे काम व्यवस्थापनाच्या निकटवर्तीयास मिळाले. मात्र नियमानुसार पुरवठा होत नव्हता. हे माहीत होणे हेदेखील हत्येमागील एक कारण असावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App