विशेष प्रतिनिधी
दिल्ली : कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले आहे. र कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आवारात झालेली ताेडफाेड राेखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आपल्याच माणसाचे रक्षण जर सरकार करून शकत नसेल तर हे संपूर्ण राज्य यंत्रणेचे अपयश असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
लाइव्ह लॉने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, घटनास्थळी पोलिसांचा माेठा फौजफाटा उपस्थित होता. मात्र स्वत:च्या माणसांचे माणसांचे रक्षण करू शकले नाहीत? हे अत्यंत लाजीरवाणे आहे. जर पाेलीस स्वत:चे रक्षण करू शकत नसतील तर डाॅक्टर येथे निर्धास्तपणे काम कसे करणार? तुम्हाला जमावबंदी लागू करता येऊ शकत हाेती. इतका सगळा गाेंधळ सुरू असताना पाेलीसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालायला हवा हाेता. सात हजार लाेक असेच चालत येऊ शकत नाहीत. कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदाेलकांच्या रुपात समाजकंटक हॉस्पिटलच्या आवारात घुसले.
मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. लाठ्या, विटा आणि रॉड घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी आपत्कालीन वॉर्ड, त्याचे नर्सिंग स्टेशन आणि मेडिसीन स्टोअरची तोडफोड केली. तसेच हॉस्पिटलमधील बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) भागाचीही तोडफोड केली. तसेच परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. तोडफोड केल्याने पोलिसांचे एक वाहन उलटले आणि अनेक दुचाकींचे नुकसान झाले.
काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पाेलीसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फाेडाव्या लागल्या. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी कोलकाता पोलिसांकडून काढून घेण्यात जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यास प्रवृत्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App