Who Is Naxal Commander Hidma : सुकमा-विजापूर सीमेवर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली, त्यानंतर काही तास चाललेल्या या एन्काउंटरमध्ये अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. ही मोहीम सुरू करण्यामागे एक गुप्तचर अहवाल होता. सुरक्षा दलांना अशी बातमी मिळाली होती की, वाँटेड नक्षलवादी कमांडर हिडमा हा छत्तीसगडच्या जंगलात दडून बसलेला आहे. शनिवारच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हिडमाच असल्याचे मानले जात आहे. Know Who Is Naxal Commander Hidma, Mastermind Of Chhattisgarh Encounter
विशेष प्रतिनिधी
विजापूर : शनिवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले, तर 31 जखमी झाले. सुकमा-विजापूर सीमेवर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली, त्यानंतर काही तास चाललेल्या या एन्काउंटरमध्ये अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. ही मोहीम सुरू करण्यामागे एक गुप्तचर अहवाल होता. सुरक्षा दलांना अशी बातमी मिळाली होती की, वाँटेड नक्षलवादी कमांडर हिडमा हा छत्तीसगडच्या जंगलात दडून बसलेला आहे. शनिवारच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हिडमाच असल्याचे मानले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नक्षलवाद्यांचा गट आधीपासूनच या कारवाईची वाट पाहत होता. मोहिमेच्या ठिकाणी सुरक्षा दल जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्यावर तीन तास गोळीबार सुरू होता.
हिडमाचे वय 40 च्या आसपास आहे. तो मूळचा सुकमा जिल्ह्यातील एका खेड्यातील आदिवासी आहे. 90च्या दशकात तो नक्षलवादी झाला. पीपल्स लिबरेशन गेरिला आर्मी (पीएलजीए)च्या बटालियन क्रमांक 1 चा तो प्रमुख आहे. हिडमा त्यांच्या भयंकर आणि प्राणघातक हल्ल्यांसाठी ओळखला जातो. हिडमा महिलांसह सुमारे 180 ते 250 नक्षलवाद्यांच्या गटाचा नेता आहे.
हिडमाचे कोणतेही छायाचित्र उपलब्ध नाही. हिडमावर तब्बल 40 लाख रुपयांचे बक्षीस आहे, यावरून तो किती कुप्रसिद्ध आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
एनआयएनेही हिडमाविरोधात मांडवी हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. भीमा मांडवी हे भाजपचे आमदार होते. एप्रिल 2019 मध्ये दंतेवाडा येथे त्यांच्यावर हल्ला झाला होता, त्यात ते, त्यांचा ड्रायव्हर आणि तीन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते.
शनिवारीही नक्षली टोळीचे नेतृत्व हिडमानेच केले होते. गतवर्षीसुद्धा सुकमाच्या मिनापामध्ये नक्षलवाद्यांनी असाच हल्ला केला होता, त्यातही 17 जवान शहीद झाले होते.
Know Who Is Naxal Commander Hidma, Mastermind Of Chhattisgarh Encounter
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App