Indrajaal : जम्मूमधील भारतीय हवाई दलावर (आयएएफ) ड्रोन हल्ल्यामुळे हवाई दलासह सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. जम्मू हवाई दल स्टेशन पाकिस्तान सीमेपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्यांदाच भारतातील दहशतवादी हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला असून या हल्ल्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, सैन्याने आता नव्या प्रकारच्या युद्धासाठी स्वत:ला तयार करावे. या हल्ल्यादरम्यान एका भारतीय कंपनीने देशातील पहिली अशी ड्रोन डिफेन्स सिस्टिम तयार केली आहे, जी शत्रूच्या बाजूने येणाऱ्या अशा अनेक हल्ल्यांना परतवू शकते. Know About Indian autonomous drone defense dome system Indrajaal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मूमधील भारतीय हवाई दलावर (आयएएफ) ड्रोन हल्ल्यामुळे हवाई दलासह सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. जम्मू हवाई दल स्टेशन पाकिस्तान सीमेपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्यांदाच भारतातील दहशतवादी हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला असून या हल्ल्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, सैन्याने आता नव्या प्रकारच्या युद्धासाठी स्वत:ला तयार करावे. या हल्ल्यादरम्यान एका भारतीय कंपनीने देशातील पहिली अशी ड्रोन डिफेन्स सिस्टिम तयार केली आहे, जी शत्रूच्या बाजूने येणाऱ्या अशा अनेक हल्ल्यांना परतवू शकते.
या ड्रोन डिफेन्स सिस्टमचे नाव ‘इंद्राजाल’ असून ते ग्रीन रोबोटिक्सने तयार केले आहे. ही देशातील पहिली स्वदेशी ड्रोन डिफेन्स सिस्टिम आहे. हे ड्रोन डिफेन्स 1000 ते 2000 चौरस किलोमीटरवरील हल्ल्यांना रोखू शकते. ग्रीन रोबोटिक्सने 8 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हे तयार केले आहे. ग्रीन रोबोटिक्सच्या सल्लागार मंडळावर असलेले सेवानिवृत्त डिफेन्स सायंटिस्ट, उप सेना प्रमुख, बीईएलचे डायरेक्टर आणि एअर फोर्सच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी हे तयार करण्यात बरीच मदत केली.
मॉडर्न वॉरफेयरच्या मालिकेत इंद्राजाल ड्रोन डिफेन्स सिस्टिमला तिसरी क्रांती म्हणून पाहिले जात आहे. ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाने तयार केली आहे. याव्यतिरिक्त सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स वास्तविकतेच्या आधारावर धोका ओळखू शकतात आणि त्या त्वरित कारवाईही करू शकतात. हा धोका एकच यूएव्ही असो किंवा अनेक यूएव्हीचा एकाच वेळी हल्ला असो, इंद्रजाल प्रत्येक धोका रोखू शकतो.
Know About Indian autonomous drone defense dome system Indrajaal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App