कोलकाता महापालिका निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणी सुरू झाली आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या 144 प्रभागांच्या मतमोजणीसाठी एकूण 16 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. KMC Election Results Kolkata Municipal Corporation counting of votes begins, Trinamool ahead in more than 134 seats
वृत्तसंस्था
कोलकाता : कोलकाता महापालिका निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणी सुरू झाली आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या 144 प्रभागांच्या मतमोजणीसाठी एकूण 16 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 200 मीटरच्या परिघात कलम 144 लागू राहील, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना या 200 मीटरच्या परिघात येऊ दिले जाणार नाही. सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी कोलकाता पोलिसांच्या हाती आहे. याशिवाय, कोविडच्या पार्श्वभूमीवर, मतमोजणी केंद्रातील एजंटांसाठी लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.
19 डिसेंबर रोजी झालेल्या कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत सुमारे 64% मतदान झाले आहे. कोलकाता महानगरपालिकेवर टीएमसी आपली पकड पुन्हा मिळवू शकेल की भाजप आपला जनाधार वाढवू शकेल, याचा फैसला आज होणार आहे.
गतवेळच्या निकालांवर नजर टाकली तर 2015 च्या कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 144 पैकी 114 वॉर्ड जिंकले होते. दुसरे स्थान सीपीएमकडे गेले होते. जिथे सीपीएमला 2010 मध्ये 33 जागांच्या तुलनेत 2015 मध्ये केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 7 जागा मिळाल्या होत्या, ज्या 2010 मधील 3 जागांपेक्षा किंचित जास्त होत्या. दुसरीकडे, 2010 मध्ये 8 जागांच्या तुलनेत 2015 मध्ये काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या.
भाजप, सीपीएमची उच्च न्यायालयात धाव
केएमसी निवडणुकीत हिंसाचार आणि हेराफेरी झाल्याचा आरोप करत भाजप आणि सीपीएमने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 23 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि सीपीएमने संपूर्ण केएमसी निवडणूक रद्द करण्याची तसेच फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आगेकूच केली आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये तृणमूल 134 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजप 3 जागांवर पुढे आहे. डावे 4 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App