विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मिस इंडिया’ स्पर्धेत दलित, आदिवासी आणि ओबीसी महिलांना स्थान मिळत नाही, असे अजब वक्तव्य काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले हाेते. यावर ‘बालबुद्धी’ म्हणत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी निशाणा साधला आहे. जात जनगणनेसंदर्भात वक्तव्य करून देशात फूट पाडण्याची गांधींची इच्छा असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे. Kiran Rijiju targets Rahul Gandhi
त्यांनी एक्स या साेशल नेटवर्कींग साइटवर राहूल गांधींवर टीका करताना म्हटले आहे की, आता त्यांना मिस इंडिया स्पर्धा, चित्रपट आणि खेळांतही आरक्षण हवे आहे! हा केवळ ‘बालबुद्धीचा’ मुद्दा नसून त्याचा जयजयकार करणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत! बालबुद्धी मनोरंजनासाठी चांगली असू शकते, मात्र आपल्या फुटीच्या चालीत, आमच्या मागास समाजाची चेष्टा करू नका. मिस इंडिया उमेदवारांची निवड सरकार करत नाही. सरकार मिस इंडियासाठी उमेदवारांची निवड करत नाही. ना ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची अथवा चित्रपटांसाठी अभिनेत्यांची निवड सरकार करते.
रिजिजू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाला आएएस, आयपीएस, आएफएस आणि इतर सर्व उच्च सेवांसाठी आरक्षणात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक फोटो काँग्रेसला टॅग करून यामधील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायातील एक तरी व्यक्ती शोधून दाखवा, असे आव्हान दिलं आहे. बालकबुद्धीचं राजकारण ही एक फसवणूक आहे, असा टोलाही लगावला हाेता.
Rahul Gandhi Ji, Governments don't select Miss India, Govts don't select athletes for Olympics, and Govts do not choose actors for Films! https://t.co/hQPkM6njc9 — Kiren Rijiju (@KirenRijiju) August 25, 2024
Rahul Gandhi Ji, Governments don't select Miss India, Govts don't select athletes for Olympics, and Govts do not choose actors for Films! https://t.co/hQPkM6njc9
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 25, 2024
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, मी मिस इंडियाची यादी पाहिली. त्यामध्ये कुणीही दलित, आदिवासी किंवा ओबीसी महिला नाही आहे. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबाबत बोलतील. कुणी मोची किंवा प्लंबरला दाखवणार नाही. एवढंच नाही तर प्रसारमाध्यमांमधील आघाडीच्या अँकर्समध्येही ९० टक्क्यांमधील कुणी नाही आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App