विशेष प्रतिनिधी
पुणे : सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या केसमध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. नुकताच एक बातमी आली आहे की किरण गोसावी यांची असिस्टंट शेरबानो कुरेशी हिला अटक करण्यात पुणे पोलिसांनी यश मिळवले आहे.
Kiran gosavi’s assistant sherbano khureshi has been arrested
तर आहे किरण गोसावी?
आर्यन खानला अटक झाल्यानंतर एक फोटो व्हायरल झाला होता. ज्या फोटोमध्ये एक माणूस आर्यन खानसोबत सेल्फी घेताना दिसून येत होता. त्याच व्यक्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो व्यक्ती आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती मिळून आर्यनला एका घरामध्ये घेऊन जात आहेत. त्या सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे किरण गोसावी.
आर्यन खान प्रकरणी एनसीबीचा पंच झालेल्या किरण गोसावी विरोधात महाराष्ट्र पोलीस लागले, जुन्या प्रकरणात पालघर जिल्ह्यात गुन्हा
तो मलेशियामध्ये एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो. त्याच्यावर फसवणुकीचे बरेच आरोपदेखील नोंद झाले आहेत. पुण्यामधील चिन्मय देशमुख याला मलेशियामधील हॉटेलमध्ये नोकरी देतो असे आमिष दाखवून त्याने त्याच्याकडून तीन लाख रूपये घेतले होते. ह्या वेळी किरण सोबत शेरबानो कुरेशी देखील होती. ह्या दोघांच्या नावावर बर्याच फसवणुकीच्या केस नोंद झालेल्या आहेत.
हाच किरण गोसावी आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्याच दिवशी एनसीबीच्या ऑफिसमध्ये देखील दिसून आला होता. किरण गोसावीसोबत आणखी एक व्यक्ती होता. त्याचे नाव आहे मनीष भानुशाली. मनीष भानुशाली हे एक बीजेपी कार्यकर्ता आहेत. त्यांनी मुंबईमध्ये बऱ्याच निवडणुका देखील
भाजपकडून लढवल्या आहेत. भानुशाली आणि गोसावी या दोघांनाही एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खानला अटक झाल्यानंतर स्पॉट करण्यात आले होते. ही सर्व माहिती नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर देत ह्यावर प्रश्न विचारले होते.
पुणे पोलिसांची दोन पथके किरण गाेसावीच्या मागावर होती. त्यातील एका पथकाने शेरवानी कुरेशी यांना अटक केली आहे. या अटकेनंतर त्यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. या अटकेमुळे किरण गोसावी यांना शोधून काढण्यामध्ये पोलिसांना मदत मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App