वृत्तसंस्था
बेंगलुरु : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून पूर्ण बहुमतानिशी सत्ता मिळवल्यानंतर पक्षात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र चुरस असून मधल्या मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बाजी मारून जातायेत की काय??, अशी चर्चा कर्नाटक मधल्या राजकीय वर्तुळात आहे. Kharge-Siddaramaiah-Shivakumar’s “combined” show of strength in Karnataka during the Chief Ministerial race
या पार्श्वभूमीवर स्वतः मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर आज सायंकाळी एकत्रित शक्तिप्रदर्शन केले. कर्नाटकात काँग्रेसचा एकजुटीचा विजय झाला आहे हे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. मात्र या मेळाव्यात देखील या तिन्ही नेत्यांमधील सुप्त स्पर्धा दिसून आली.
#WATCH बेंगलुरु: कर्नाटक विधानसभा चुनाव में कांग्रेस की जीत के उपलक्ष्य में राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राज्य पार्टी प्रमुख डी.के. शिवकुमार और पूर्व मुख्यमंत्री सिद्धारमैया सहित कांग्रेस नेताओं ने शक्ति प्रदर्शन किया। pic.twitter.com/ccyiFVnKKX — ANI_HindiNews (@AHindinews) May 13, 2023
#WATCH बेंगलुरु: कर्नाटक विधानसभा चुनाव में कांग्रेस की जीत के उपलक्ष्य में राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राज्य पार्टी प्रमुख डी.के. शिवकुमार और पूर्व मुख्यमंत्री सिद्धारमैया सहित कांग्रेस नेताओं ने शक्ति प्रदर्शन किया। pic.twitter.com/ccyiFVnKKX
— ANI_HindiNews (@AHindinews) May 13, 2023
या मेळाव्यात मल्लिकार्जुन खर्गे यांचे मुख्य भाषण झाले सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार बोलले परंतु त्यांच्या वक्तव्यातून पक्ष संघटनात्मक एकजुटीखेरीज मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाल्याचेच स्पष्ट झाले. त्याचवेळी कर्नाटकाचा विजय हा संसदेच्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची पहिली पायरी आहे असे सांगायला हे तिन्ही नेते विसरले नाहीत.
डी. के. शिवकुमार यांनी आपण काँग्रेसची सत्ता कर्नाटकात करण्यासाठी किती कष्ट घेतले याचे वर्णन केले. ते वर्णन करताना त्यांनी राज्यातल्या बाकीच्या नेत्यांची नावे घेतली नाहीत. त्यांचा सगळा भर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांची स्तुती करण्यावरच राहिला.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर काँग्रेस पक्ष श्रेष्ठी ठरवतील तो मुख्यमंत्री स्वीकारा, असा स्पष्ट संदेश दिला. सिद्धरामय्या यांनी आपली सेवा जेष्ठता कार्यकर्त्यांसमोर ठासून सांगितली.
एक प्रकारे तिन्ही नेत्यांनी एकत्रित शक्तिप्रदर्शन करताना आपापली बाजू कार्यकर्त्यांसमोर बळकटपणे मांडण्याचा प्रयत्न केला. आता यातून पक्षश्रेष्ठी कोणता संदेश घेणार?? आणि या मेळाव्याला उपस्थित असलेले काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल काँग्रेस हायकमांड समोर या शक्तिप्रदर्शनातला संदेश कसा पोहोचवणार??, यावर बरेच काही म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण बसणार??, हे अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App