खलिस्तान्यांची आसामच्या मुख्यमंत्र्यांना धमकी, म्हणाले- आमची लढाई सरकारशी, मध्ये पडू नका!


वृत्तसंस्था

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना खलिस्तान समर्थक वारीस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या साथीदारांविरुद्ध कारवाईवरून धमकी मिळाली आहे. शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने ही धमकी दिली आहे. दहशतवाद्याने सरमा यांना त्याच्या आणि भारत सरकारमधील वादात न पडण्याचा इशारा दिला आहे.Khalistani’s threat to the Chief Minister of Assam, said – our fight with the government, do not get involved!

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पत्रकारांना फोन करून मुख्यमंत्र्यांना ही धमकी दिली आहे. आसामच्या तुरुंगात कैद असलेल्या खलिस्तान समर्थकांवर अत्याचार करण्यात आल्याचे तो म्हणाला. सीएम सरमा, नीट ऐका. ही संपूर्ण लढाई भारत सरकार आणि खलिस्तान समर्थकांमध्ये आहे. तुम्ही या हिंसाचाराची शिकार बनू नका.संघटना म्हणाली- आम्हाला पंजाबला भारतापासून वेगळे करायचे आहे

सीएम सरमा यांना धमकावत पन्नू म्हणाला की, आम्हाला शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेद्वारे पंजाबची भारताच्या ताब्यातून मुक्तता हवी आहे. दिब्रुगढ सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या खलिस्तान समर्थकांवर तुमचे सरकार अत्याचार आणि छळ करत असेल तर तुम्हालाच जबाबदार धरले जाईल.

खलिस्तान समर्थकांनी केला होता पोलीस ठाण्यावर हल्ला

अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेवर पोलिसांनी 18 मार्चपासून कारवाई सुरू केली. या कारवाईत पोलिसांनी एका खलिस्तान समर्थकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या खलिस्तानी कार्यकर्त्याच्या सुटकेसाठी त्याच्या साथीदारांनी अमृतसरमधील अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. त्यांच्या हातात बंदुका, तलवारी आणि भाले होते. हे लोक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा निकटवर्तीय लवप्रीत सिंग तुफानच्या अटकेविरोधात आंदोलन करत होते. या हल्ल्यानंतर दबावाखाली येऊन पंजाब पोलिसांना आरोपींना सोडण्याची घोषणा करावी लागली होती.

Khalistani’s threat to the Chief Minister of Assam, said – our fight with the government, do not get involved!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात