वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशविघातक कारवाया करणा-या खलिस्तानी दहशतवादी संघटनांविरोधात एनआयएला सोमवारी मोठे यश आले आहे. खलिस्तानी संघटनांशी संबंधित कुख्यात दहशतवाद्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. त्याला दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. Khalistani terrorist with 5 lakh reward NIA arrested
खलिस्तानी संघटनांशी संबंध
कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया या दहशतवाद्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स या खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी खानपुरिया याचे संबंध आहेत.
TERRORIST ATTACK:मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद; पत्नी आणि मुलाचाही मृत्यू
2019 पासून फरार असलेला कुलविंदरजीत हा अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभागी होता. तसेच पंजाबातील अनेक हत्याकांडांमध्ये देखील त्याचा समावेश होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 5 लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते.
कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया हा 18 नोव्हेंबरला बँकॉकहून दिल्लीत आला होता. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खानपुरिया याला ताब्यात घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App