वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभर सध्या चर्चेत असलेल्या विविध राजकीय वादांमध्ये युवक युवतींच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आली आहे. आज 22 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरात 45 शहरांमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यांमध्ये तब्बल 71000 युवक युवतींना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10.30 वाजता या मेळाव्यांमध्ये ऑनलाईन सहभागी होणार असून ते युवकांना संबोधित करणार आहेत. Job opportunities: Today employment opportunities are available in 45 cities in the country
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पुढील वर्ष अखेरीपर्यंत म्हणजे 2023 डिसेंबर पर्यंत 10 लाख रोजगार देण्याची महत्त्वाकांविषयी योजना आखली आहे. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने विविध शहरांमध्ये रोजगार मेळावे घेऊन युवक युवतींना नियुक्तीपत्रे वाटप सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या सेवेतील विविध स्तरांवरील रिक्त जागा भरण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज 22 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरातील 45 शहरांमध्ये रोजगार मिळावे घेऊन त्यामध्ये तब्बल 71000 युवक युवतींना नियुक्तीपत्रे वाटण्याचा कार्यक्रम होणार आहे.
पहिल्या टप्प्यामधल्या रोजगार मेळाव्यांमध्ये तब्बल 75000 जणांना नियुक्तीपत्रे आधीच वाटण्यात आली आहेत. आज नियुक्तीपत्रे वाटपाचा दुसरा टप्पा असून त्यामध्ये 71000 हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. या पद्धतीचे रोजगार मेळावे पुढच्या वर्षभरात अनेक ठिकाणी आयोजित करून 10 लाख रोजगार निर्मिती करण्याची योजना यशस्वी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App