खालसा धर्म हाच सर्व धर्मांचा गुरू आहे असे म्हणत एका खलिस्थानवाद्याने देवी दुर्गाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. हेमकुंड पर्वतावर तुमच्या दुर्गाला नग्न नाचायला कोणी भाग पाडले असे म्हणतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Khalistani supporters’ offensive statement about Goddess Durga
विशेष प्रतिनिधी
अमृतसर : खालसा धर्म हाच सर्व धर्मांचा गुरू आहे असे म्हणत एका खलिस्थानवाद्याने देवी दुर्गाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. हेमकुंड पर्वतावर तुमच्या दुर्गाला नग्न नाचायला कोणी भाग पाडले असे म्हणतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खलिस्तानी समर्थकांच्या जमावाने 29 एप्रिल रोजी शिवसेनेने काढलेल्या मोर्चाच्या वेळी काली मंदिरावर हल्ला केला होता. त्यानंतर एका खलिस्थानवाद्याने हिंदू देवी दुर्गाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. त्याने म्हटले आहे की, पुराणातील एक दाखला देत त्याने म्हटले आहे की, हेमकुंड पर्वतावरील ते वाईट लोक कोण होते? तुमच्या दुगार्ला नग्न नाचायला कोणी भाग पाडले? जेव्हा राक्षसांनी इंद्रदेवाचे घर लुटले आणि दुगार्ला नग्न नृत्य केले तेव्हा तिला कोणी वाचवले? या लोकांनी हेमकुंड पर्वत ग्रंथात दाखवा.
पटियालात खलिस्तान्यांना थेट भिडणारे शिवसैनिक हरीष सिंगला शिवसेनेकडून तडकाफडकी निलंबित!!
पोलीस जमावावर गोळीबार करताना खलिस्थानी समर्थक भांगडा करत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पटियालामध्ये शुक्रवारी शिवसेनेने खलिस्तान मुदार्बाद म्हणत मोर्चा काढला होता. यावेळी खलिस्तान समर्थकांनी दगड आणि तलवारीने मोर्चावर हल्ला केल्यावर हिंसाचार झाला. मोचार्तील सहभागींना मारहाण करताना खलिस्तान समर्थकांनी खलिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या. हिंदूंनी मंदिराच्या आवारात आश्रय घेतल्यानंतर खलिस्तान समर्थक रॅलीने काली माता मंदिरावर हल्ला केला.
व्हिडिओची मूळ क्लिप प्रो पंजाब टीव्हीने त्यांच्या फेसबुक चॅनलवर अपलोड केली आहे. नंतर, त्यांनी वादग्रस्त भाग हटवला आणि त्यांच्या चॅनेलवर क्लिप पुन्हा अपलोड केली. तथापि, तोपर्यंत, क्लिपचा वादग्रस्त भाग व्हायरल झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App