वृत्तसंस्था
चेन्नई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराजने विजयी चौकार मारल्यानंतर लिहिले जय श्री हनुमान!!keshav maharaj pens after beats southafrica jayshree hanuman
काल चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचक सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानी दक्षिण आफ्रिके विरुद्ध 270 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु या आव्हानाला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 127 अशी बिकट झाली. पण नंतर केशव महाराजने अन्य फलंदाजांना साथीला घेऊन दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेने 1 विकेट राखत पाकिस्तानचा पराभव केला. केशव महाराजने विजयी चौकार मारला.
त्यानंतर केशव महाराजने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केली. आमचा देवावर विश्वास आहे. आमच्या टीमने देवावर विश्वास ठेवून कामगिरी बजावली. तबरेज सम्शी आणि एडी मार्कम यांनी तडाखेबंद परफॉर्मन्स दिला. त्यामुळे विजय झाला. जय श्री हनुमान!!
केशव महाराज हनुमानाचा भक्त आहे. केशव महाराजचे वडील आत्मानंद महाराज हे देखील दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळायचे. केशव महाराजचे पूर्वज 1800 च्या दशकात उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले. पण या कुटुंबाने आपले जुने अध्यात्मिक संस्कार सोडले नाहीत. त्यातूनच केशव महाराज हनुमान भक्त झाला आणि पाकिस्तान विरुद्ध विजय चौकार मारल्यानंतर त्याने सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहित जय श्री हनुमान केले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App