केरळ ट्रेन जाळपोळ प्रकरण: कट्टरपंथी व्हिडिओ पाहून शाहरुख झाला जिहादी; NIAच्या आरोपपत्रात अनेक खुलासे

NIA

एनआयएने आरोपपत्रात अनेक खुलासे केले आहेत.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली :  केरळ ट्रेन जाळपोळ प्रकरणातील एकमेव आरोपीविरुद्ध एनआयएने आरोपपत्र तयार केले आहे. शाहरुख सैफी असे २७ वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपपत्रानुसार, कट्टरपंथी व्हिडिओ पाहून आरोपी जिहादी झाला. एनआयएने आरोपपत्रात अनेक खुलासे केले आहेत. एप्रिलमध्ये घडलेल्या या घटनेत एका मुलासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. Kerala train arson case Shah Rukh turns jihadist after watching radical video; Many revelations in the NIA charge sheet

आरोपी शाहरुख सैफीवर IPC, UA(P)A, रेल्वे कायदा आणि PDPP कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. एनआयएच्या म्हणण्यानुसार, शाहरुख सैफीवर दहशतवादी कृत्य केल्याचा आरोप आहे, ज्याने यावर्षी 2 एप्रिल रोजी अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या डी1 कोचला आग लावली होती.

एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आरोपीने प्रवाशांवर पेट्रोल फेकले  लोकांना मारण्याच्या उद्देशाने लायटरने बोगी पेटवली. एनआयएच्या तपासात उघड झाले आहे की सैफी दहशतवादी कृत्य करण्यासाठी केरळमध्ये गेला होता, कारण त्याला त्याचे जिहादी काम अशा ठिकाणी करायचे होते जिथे त्याला ओळखले जाऊ शकत नाही. या घटनेनंतर सामान्य जीवनात परतण्याचा त्यांचा मानस होता. सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हा त्याचा उद्देश होता.

Kerala train arson case Shah Rukh turns jihadist after watching radical video; Many revelations in the NIA charge sheet

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात