Asian Games 2023: भारताने स्क्वॉशमध्ये इतिहास रचला, पाकिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रत्येक खेळात चांगली कामगिरी करत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा -2023 मध्ये आतापर्यंत एकूण १० वे सुवर्णपदक जिंकले आहेत. पाकिस्तानसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदक पटकावले आहे. सौरव घोषाल, अभय सिंग आणि महेश माणगावकर या भारतीय त्रिकुटाने सुवर्णपदक पटकावले आहे. Asian Games 2023 India create history in squash defeat Pakistan to win gold

अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात भारताने शेवटच्या सेटमध्ये विरोधी संघाचा पराभव करत सांघिक खेळात 2-1 असा विजय मिळवला. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत प्रत्येक खेळात चांगली कामगिरी करत असून आता स्क्वॉशमध्ये पदक मिळणे ही भारतासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.

आशियाई खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या मणिपूरच्या रोशिबिनाची कहाणी; आई-वडील हिंसाचारात अडकले, चीनमध्ये मुलीने जिंकले सिल्व्हर मेडल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या सामन्यात भारताचा महेश माणगावकर आणि पाकिस्तानचा नासिर इक्बाल आमनेसामने आले. यामध्ये महेशने ३-० असा मोठा विजय नोंदवला. दुसऱ्या गेममध्ये भारताचा सौरव घोषाल आणि पाकिस्तानचा असीम खान यांच्यातील सामन्यात भारतीय स्क्वॉशपटू सौरवने पुन्हा एकदा ३-० असा विजय मिळवला.  पुढच्या सामन्यात भारताच्या अभय सिंगने नूर जामाचा ३-२ असा पराभव केला. अशाप्रकारे स्क्वॉशच्या सांघिक खेळात भारताने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023 India create history in squash defeat Pakistan to win gold

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात