विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : हुंडाबळी, महिला अत्याचाराबाबत सामाजिक जागृती करण्यासाठी केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी बुधवारी उपोषण केले. विविध गांधीवादी संघटनांनी याबाबत पुकारलेल्या आंदोलनाला त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दिला. सामाजिक कारणावरून राज्यपालांनी केलेले हे पहिलेच उपोषण ठरले. Kerala Governor did fast
भाजप नेते व केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून राज्यपालांचे अभिनंदन केले. उपोषण संपण्यापूर्वी त्यांनी गांधी भवनमध्ये आयोजित प्रार्थनेतही सहभाग घेतला. थेट राज्यपालांचे उपोषण केरळमध्ये चर्चेचा विषय ठरले. विरोधी काँग्रेस व भाजपने महिला अत्याचाराविरुद्ध जागृती करण्यासाठी गांधीवादी मार्ग स्वीकारल्याबद्दल राज्यपालांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्री पी.विजयन यांच्या सरकारला महिला सुरक्षिततेत अपयश आल्यानेच राज्यपालांना डोळे उघडण्यासाठी उपोषण करावे लागले, असा आरोपही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App