विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये विजय मिळविल्यावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दलीतांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरण्यास सुरूवात केली आहे.Kejriwal’s new game now, Attempt to attract Dalits by using Dr. Babasaheb Ambedkar’s name
आम आदमी पक्षाकडे स्वत:ची हक्काची मतपेढी नाही याची केजरीवाल यांना खंत आहे. त्यामुळे कॉँग्रेसपासून ते बहुजन समाज पक्षापासून दुरावलेली आणि भारतीय जनता पक्षाकडे गेलेली दलीत मतपेढी आपल्याकडे यावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. यासाठी दिल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बाबासाहेब: द ग्रँड म्युझिकल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
आंबेडकरांच्या जीवनाचा उत्सव दोन तासांच्या संगीतमय कार्यक्रमात असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. दिल्ली पर्यटन आणि वाहतूक विकास महामंडळाने या संगीत नाटकाची निर्मिती केली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये या संगीत नाटकाच्या जाहिराती केल्या आहेत. भारतातील दलित समाजाच्या संघर्षांवर सामाजिक भाष्य करते.
आंबेडकरांच्या जीवनातील काही प्रसंग यामध्ये दाखविण्यात आले आहे. त्यांचे बालपण, ‘दलित’ वकील म्हणून आलेले अनुभव, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याशी वैचारिक मतभेद आणि 1956 मध्ये त्यांचे निधन यांचा यामध्ये समावेश आहे.
मात्र, या सगळ्यामागे दलीत मतपेढीला आपल्याकडे आकर्षित करणे हा उद्देश असल्याचे मानले जात आहे. पंजाबमध्ये भगतसिंग यांचे नाव वापरून आपने विजय मिळविला. त्याच पध्दतीने दिल्ली महापालिका तसेच इतर राज्यांतील निवडणुकांत दलीत समाजाने आपल्याकडे यावे यासाठी केजरीवाल सरकार हे करत असल्याचा आरोप केला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App