पंजाबमध्ये केजरीवालांची मुक्ताफळे; काँग्रेसचे 25 आमदार संपर्कात, पण काँग्रेसचा “कचरा” स्वीकारणार नाही!!

वृत्तसंस्था

चंडीगढ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतला कारभार सोडून निवडणूक असलेल्या विविध राज्यांचा दौरा करत आहेत. आज पंजाब दौऱ्यात त्यांनी आपल्या मुखातून मुक्ताफळे उधळली आहेत. काँग्रेसचे 25 आमदार आम आदमी पार्टीच्या संपर्कात आहेत, परंतु आम्ही काँग्रेसचा “कचरा” स्वीकारणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. अरविंद केजरीवाल यांनी थेट काँग्रेसच्या आमदारांनाच “कचरा” म्हणल्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये संताप उसळला आहे. Kejriwal’s pearls in Punjab; 25 Congress MLAs in touch, but will not accept Congress’s “garbage” !!

आपल्या पंजाब दौऱ्यात अरविंद केजरीवाल सध्या अमृतसर मध्ये आहेत. येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, की काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आजही आम आदमी पार्टीच्या संपर्कात आहेत. मी तुम्हाला आव्हान देतो. आम्ही जर त्यांना पक्षात प्रवेश द्यायचे ठरवले तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे 25 आमदार आणि दोन – तीन खासदार आम आदमी पार्टीत सामील झालेले असतील. परंतु आम्हाला त्यांचा “कचरा” स्वीकारण्याची गरज नाही आणि काँग्रेसचा “कचरा” आम आदमी पार्टीत घेणार नाही.अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये संताप उसळला असून केजरीवाल यांच्यासारखे वरिष्ठ आयएएस अधिकारी राहिलेले व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या दर्जाची भाषा कशी काय वापरू शकतात? आमदार यांसारख्या लोकप्रतिनिधींना ते “कचरा” कसे काय म्हणू शकतात?, असे सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहेत.

परंतु, त्याचवेळी केजरीवाल यांनी दावा केल्यानुसार 25 आमदार जर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांच्या संपर्कात असतील, तर ते नेमके कोण आहेत? याची चाचपणी देखील काँग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळातून सुरू झाली आहे. आधीच कॅप्टन अमरिंदरसिंग यांना दूर केल्यानंतर काँग्रेस आमदारांनी मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आज चरणजीत चन्नी हे जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या पदावर नवज्योत सिंग सिद्धू यांचा डोळा आहे. त्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या काँग्रेसमध्ये एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी 25 आमदार आम आदमी पार्टीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य करून राजकीय बाण मारला आहे.

त्यांच्या वक्तव्यात “कचरा” हा शब्दा आला असला आणि तो असंसदीय असला तरी त्यांच्या वक्तव्याचा गाभा हा राजकीय भूकंप सूचित करणार आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेस मध्ये दुहेरी अस्वस्थता पसरली आहे.

Kejriwal’s pearls in Punjab; 25 Congress MLAs in touch, but will not accept Congress’s “garbage” !!

महत्त्वाच्या बातम्या