केजरीवालांचा खोटेपणा तिहारच्या वैद्यकीय अहवालातून उघड; केजरीवालांचे वजन महिनाभरात 64 ते 66 किलो दरम्यान फिरले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दारू घोटाळ्याचा आरोप असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री के अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात परत जावे लागणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने दिलेली त्यांची जामीनाची मुदत त्यादिवशी संपते आहे. परंतु आपल्याला वैद्यकीय कारणासाठी जामीन वाढवून मिळावा असा तातडीचा अर्ज केजरीवालांनी सुप्रीम कोर्टापासून खालच्या कोर्टापर्यंत सगळीकडे करून बघितला. परंतु प्रत्येक कोर्टाने त्यांना फटकारत त्या अर्जाची तातडीने सुनावणी घेणे नाकारले.Kejriwal’s lie revealed in Tihar’s medical report; Kejriwal’s weight fluctuated between 64 and 66 kg in a month!!



दरम्यानच्या काळात अरविंद केजरीवालांनी आपले वजन घटले आहे. आपल्याला गंभीर आजाराची लक्षणे दिसत आहेत. जे आजार तुरुंगात राहून बरे होऊ शकत नाहीत. त्या आजारांवर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच उपचार करता येऊ शकतील, असे आजार आपल्याला जडले आहेत, असा दावा केला. गेले 22 दिवस अरविंद केजरीवाल वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रचारासाठी फिरले. या सर्व कालावधीत त्यांच्यावर त्यांना अपेक्षित आणि आवश्यक असणारे वैद्यकीय उपचार होत राहिले.

परंतु अरविंद केजरीवालांचे वजन घटले आणि त्याचा परिणाम आरोग्यावर झाला, असा जो दावा त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केला, त्यातला खोटेपणा तिहार जेल मधल्या वैद्यकीय अहवालातूनच उघड्यावर आला आहे. अरविंद केजरीवाल 1 एप्रिल 2024 ते 5 मे 2024 एवढ्या कालावधीत तुरुंगात होते. त्या कालावधीत त्यांचे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना वजन केले असता ते 64 किलो ते 66 किलो याच दरम्यान फिरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. प्रत्येक तारखेनुसार अरविंद केजरीवालांचे वजन किती होते??, याचा अहवालच तिहार तुरुंगाच्या प्रशासनाने खुला केला आहे. त्या अहवालातल्या आकड्यानुसार केजरीवालांचे वजन 64 – 65 आणि 66 अशाच किलोंमध्ये राहिल्याचे दिसून येत आहे.

Kejriwal’s lie revealed in Tihar’s medical report; Kejriwal’s weight fluctuated between 64 and 66 kg in a month!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात