वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील रस्त्यांची लवकरच दुरुस्ती केली जाईल. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मी सीएम आतिशी यांना पत्र लिहिले आहे. आमच्या आमदार आणि नेत्यांनी शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली याचा मला आनंद आहे.
या पत्रकार परिषदेत आतिशीही केजरीवालांच्या शेजारी बसलेल्या दिसल्या. आतिशी म्हणाल्या- आम्हाला केजरीवाल यांचे पत्र मिळाले. त्यानंतर लगेचच पीडब्ल्यूडीने रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. सध्या 89 पैकी 74 रस्त्यांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. उर्वरित 15 रस्त्यांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Harshvardhan Patil : हर्षवर्धनना पक्षात घ्यायची पवारांची घाई; इंदापूरातल्या पवार निष्ठावंतांचाच उद्रेक होई!!
दिल्लीच्या नविन मुख्यमंत्री अतिशी यांनी 23 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. आतिशी यांनी सीएम ऑफिसमध्ये एक रिकामी खुर्ची सोडली होती आणि ती स्वतः दुसऱ्या खुर्चीवर बसल्या होत्या. आतिषी म्हणाल्या होत्या- ‘राम वनवासात गेल्यावर ज्याप्रमाणे भरतने अयोध्येचे सिंहासन घेतले, त्याचप्रमाणे मी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेईन. 4 महिन्यांनंतर दिल्लीची जनता केजरीवाल यांना पुन्हा त्याच खुर्चीवर बसवणार आहे. तोपर्यंत ही खुर्ची याच खोलीत राहून केजरीवालजींची वाट पाहील.
दिल्ली दारू धोरण प्रकरणात १३ सप्टेंबर रोजी जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 21 सप्टेंबर रोजी आतिशी दिल्लीच्या नविन मुख्यमंत्री बनल्या. 23 सप्टेंबर रोजी त्यांनी 5 मंत्र्यांसह शपथ घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App