विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात “द काश्मीर फाईल्स” या सिनेमातून जनजागृती झाल्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काश्मिरी हिंदूंच्या संघटनांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून 1990च्या दशकात काश्मीर मध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराच्या घटनांची घटनांचा फेरतपास करा आणि यासिन मलिक भेटता कराटे यांच्यासारख्या दोषींना कायदेशीर शिक्षा ठोठवा, अशी मागणी काश्मिरी पंडितांच्या संघटनांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिकेद्वारे लावून धरली आहे. Kashmiri Hindu Genocide supreme court
– 2017 मध्ये विरोधी निकाल
2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका याचिकेचा निर्णय देताना काश्मिरी पंडितांची हिंदू नरसंहाराच्या फेर तपासाची मागणी फेटाळली होती. 1990 च्या दशकातल्या झालेल्या नरसंहाराला 25 वर्षे उलटून गेली आहेत त्यामुळे पुरावे गोळा करता येणे शक्य नाही. म्हणून संबंधित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. परंतु आता क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करत काश्मिरी पंडितांच्या संघटनेने 1985 च्या शीख हत्याकांडाची फेरचौकशी आणि फेर तपास होतो तर काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची फेरचौकशी आणि फेर तपास का होत नाही? असा सवाल याचिकेत केला आहे.
– यासिन मलिक वर खटला चालवा
त्याच वेळी हवाई दलाच्या 4 अधिकाऱ्यांच्या हत्तीसाठी थेट जबाबदार असणाऱ्याला यासिन मलिक वर आणि हिंदूंच्या सामुहिक हत्याकांडाला जबाबदार असणारा बिट्टा कराटे या दोघांवर ताबडतोब खटले पुन्हा सुरू करावेत. हिंदू नरसंहाराच्या फेर तपासासाठी आणि चौकशीसाठी स्वतंत्र आयोग नेमावेत. 1990 च्या हिंसाचाराच्या फाईली जम्मू-काश्मीर पोलिसांनी बंद करून टाकल्या आहेत. त्या पुन्हा खोलाव्यात अशा मागण्या काश्मिरी पंडितांच्या संघटनेने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशन मध्ये आवर्जून केल्या आहेत. सुप्रीम कोर्टात याबाबत लवकरच सुनावणी होऊन होणे अपेक्षित असून महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकते असे बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App