विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – काश्मीर खोऱ्यातील काही युवक तालिबानमध्ये भरती झाल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानचे हस्तक असा अपप्रचार करतात. येथील युवक क्रिकेट, व्हॉलिबॉल, रग्बी खेळत आहेत. येथील प्रत्येक मुलाला आपले भविष्य सुरक्षित करायचे आहे. कुणीही भरकटू इच्छित नाही असे मत.काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केले आहे. Kashmir youth will not join Taliban
ते म्हणाले, फुटीरतावादी नेते आणि हुरियत कॉन्फरन्सचे संस्थापक सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर काश्मीर खोऱ्यातील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून लोकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे.
गिलानी यांचे बुधवारी रात्री निधन झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपर्क साधनांवर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात मोबाईलवरील संभाषण आणि इंटरनेटचा वापर यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संचारबंदी तसेच एकत्र जमण्यासही मनाई आहे.
दिलबाग यांनी बारामुल्ला येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाल लवकरच एका बैठकीत निर्बंधांचा आढावा घेऊन ते शिथिल केले जातील. गेल्या दोन दिवसांत एकही अनुचित घटना घडलेली नाही. लोकांच्या सहकार्याने सुरक्षा दले अत्यंत संयमाने काम करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App