विशेष प्रतिनिधी
वाराणासी : काशी विश्वनाथ धामचं आज 13 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे. जीआईचं उत्पादन असलेल्या हस्तशिल्पाने मोदींचं स्वागत केलं जाणार आहे. यावेळी मोदींना मुमताज अलीने खास तयार केलेलं रुद्राक्ष जडीत अंगवस्त्रम देण्यात येणार आहे.
त्रिशूळ आणि कमळावर विराजमान झालेलं शिवलिंगही मोदींना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या उत्पादनाला अंतिम रुप देण्यासाठी हस्तशिल्पकार कामाला लागले आहेत.
काशीपुराचे विजय केसरा, रमेश आणि राज्य पुरस्कार विजेते अनिल कसेरा यांनी तीन फूट आणि सहा इंच मेटल रिपोजी क्राफ्टचा त्रिशूळ तयार केला आहे. या त्रिशूळात चार नागांची आकृती रेखाटण्यात आली आहे. तर लल्लापुरा येथील रहिवासी मुमताज अली यांनी जरी-जरदोजी आणि रेशमचा प्रयोग करून 24 पंचमुखी रुद्राक्ष लावून एक अंगवस्त्र तयार केलं आहे.
15-25 दिवसात वस्तू तयार केल्या रामकटोरा येथे राहणारे चंद्रप्रकाश विश्वकर्मा यांनी 22 इंचाच्या आकृतीत कमळाच्या कळ्यांमध्ये शिवलिंग बसवलं आहे. या शिवलिंगाचं वैशिष्ट्ये म्हणजे कळ्यांमध्ये असलेल्या बटनाला दाबल्यानंतर ते उघडते आणि बंद होते.
या सर्व वस्तू तयार करण्यासाठी 15 ते 25 दिवस लागले. ही उत्पादने आजच प्रशासनाला सोपविली आहेत, असं जीआईचे डॉ. रजनीकांत यांनी सांगितलं. उद्या काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. तब्बल तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात घाटांवर देव दिवाळीप्रमाणे दिवे लावले जाणार आहेत. लेजर लाईट शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. सर्व मंदिरं, सरकारी आणि खासगी इमारतींवरही विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. पर्यटन उद्योग व इतर व्यवसायात चार नव्हे तर हजार चाँद लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App