CONGRATULATIONS INDIA : २१ वर्षांनंतर भारताला ‘Miss Universe’चा किताब ! हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद


मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मिस युनिव्हर्स २०२१ (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय हरनाज कौर संधूनं ७० वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतानं २१ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे विजेतेपद पटकावलं आहे. CONGRATULATIONS INDIA Miss Universe 2021

‘मिस युनिव्हर्स २०२१’ (Miss Universe 2021) या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) बाजी मारली आहे. इस्रायलमध्ये ही सौंदर्यस्पर्धा पार पडली. अभिनेत्री लारा दत्ताने २००० मध्ये हा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट भारतात आणला. हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स २०२० अँड्रिया मेझा हिने हरनाजला आपला मुकूट दिला.

या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजयी ठरले. “आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरुण महिलांना काय सल्ला द्याल”, असा प्रश्न टॉप ३ राऊंडमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना हरनाज म्हणाली, “स्वत:वर अतिविश्वास ठेवणं हा आजच्या तरुणाईवरील सर्वांत मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीवच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलुयात. तुम्ही समोर या, इतरांशी बोला.. कारण तुमच्या आयुष्याला घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच स्वत:चा आवाज आहात. मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आजा मी याठिकाणी उभी आहे.”

CONGRATULATIONS INDIA Miss Universe 2021

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात