प्रतिनिधी
काशी : देशभर आणि जगभर चर्चेत असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. याची निमंत्रण पत्रिका वाटपास सुरुवात झाली असून 3000 निमंत्रित लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये विविध पंथ आखाड यांचे 500 साधुसंत यांचाही समावेश आहे.Kashi vishwanath dham corridor
या सर्वांना सन्मानपूर्वक निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत काशीचा आणि विश्वनाथ धामाचा सविस्तर इतिहास वर्णन केलेला असून त्यामध्ये काशीला शिवाचे स्थान असल्याची अधिमान्यता, बारा ज्योतिर्लिंगमधले त्याचे महत्वपूर्ण स्थान तसेच सनातन वैदिक परंपरेतील अधिमान्यता यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.
तसेच ऐतिहासिक काळात बौद्ध आणि जैन परंपरांनी देखील काशी विश्वनाथ धामाचे महत्व कसे वाढवले, इथल्या साधुसंतांना कशा पद्धतीने सन्मान दिला, याचाही उल्लेख निमंत्रण पत्रिकेत करण्यात आला आहे.
मुघल आक्रमकांनी काशी विश्वनाथ धामाचा केलेला विध्वंस आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर, महाराजा रणजीत सिंह यांनी काशी विश्वनाथ धाम याचा केलेला जीर्णोद्धार याचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत खासकरून करण्यात आला आहे.
ही ऐतिहासिक धरोहर आपण पुनरुज्जीवित करत आहोत. याचे साक्षीदार बनण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे, असा उल्लेख या पत्रिकेमध्ये निमंत्रण पत्रिकेमध्ये आवर्जून करण्यात आला आहे.
संपूर्ण महिनाभर काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असून त्यामध्ये देशाच्या विकासाचे महामंथन होणे अपेक्षित आहे. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून नियोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिनाभराच्या काळात दोनदा काशी विश्वनाथ कॉरिडोरला भेट देऊन कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. याची विस्तृत निमंत्रण पत्रिका मान्यवरांना पाठविण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App