विशेष प्रतिनिधी
बंगळुरू: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही यशस्वी मुकाबला करण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. कोविड रूग्णांचा पाठपुरावा करणे, संपर्क शोधणे आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांचे निरिक्षण करण्यासाठी अॅप्सची मदत घेतली. त्याचबरोबर कोरोना लसीच्या पुरवठ्यावरही अॅपच्या मदतीने लक्ष ठेवले. आरोग्य सेवेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कर्नाटक पॅटर्न यशस्वी ठरत आहे.Karnataka pattern of corona treatment with the help of advanced technology
भारतातील सिलीकॉन व्हॅली असणारे बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे. येथील तंत्रज्ञांचा अचूक वापर येथील सरकारने करून घेतला. वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गरज असलेल्यांना बेड मिळावा त्याचबरोर कॉलबॅक सिस्टमसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होत. आॅन ग्राउंड फ्रंटलाइन वर्कर, वॉर रूम आणि चाचण्यांचे निकाल अपलोड करणाºया प्रयोगशाळा जोडण्यात आल्या.
शासकीय अधिकारी, वैद्यकीय आणि पॅरामेडिकल विद्यार्थी, आशा कामगार, डॉक्टर आणि तंत्रज्ञानाची जाण असलेले तरुण अशा विविध घटकांनी एकत्र येऊन कोरोनाविरुध्द लढण्यासाठी वॉर रूम बनविली. वॉर रूमचे प्रमुख, अधिकारी मुनीष मौदगिल यांना या वर्षीचा केंद्र सरकारचा ई-गव्हर्नन्स ज्युरी पुरस्कार मिळाला.
मौदगील म्हणाले, आम्ही पहिल्या दोन लाटांच्या वेळी वापरलेले बहुतांश अॅप्स आणखी आधुनिक प्लॅटफॉर्मवर एकत्रित केली. त्याच्या मदतीनेच आम्ही कोविड व्यवस्थापन करतो. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर आहे. त्याच्या सहाय्याने फ्रंटलाईन वर्कर प्रत्यक्ष रुग्णांशी जोडलेले राहतात.
त्यांच्या डाटाचा मागोवा घेत आरोग्यावर लक्ष ठेवतो. कर्नाटकातील आरोग्य यंत्रणेनेने तंत्रज्ञानाचा अवलंब केला. कार्यक्षमतेने आम्ही मेडटेक सोल्यूशन्स तयार केले. टेली-टेक (टेलिफोन कन्सल्टेशन) मधून एम-टेक (मोबाइल तंत्रज्ञान) पर्यंत प्रगती केली. . यामुळे केवळ कोविड-19 रूग्णांवरच देखरेख ठेवली जात नाही तर साथीच्या आजारामुळे दुर्लक्षित केलेल्या इतर वैद्यकीय समस्यांकडेही लक्ष दिले जात होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App