या निवडणुकीत बजरंगबली महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकातील सत्तेचा मुकुट कोणाच्या डोक्यावर बसणार हे चित्र काही तासांत स्पष्ट होणार आहे. सध्या कलानुसार काँग्रेस आघाडीवर आहे, तर भाजपाही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, काँग्रेसपासून भाजपापर्यंतचे बडे नेते हनुमानाच्या दर्शनला पोहोचले आहेत. खरे तर निकाल कोणत्याही पक्षाच्या बाजूने येऊ शकतो, मात्र बजरंगबली या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जात आहे. Karnataka Election Results Priyanka Gandhi Chief Minister Bommai took darshan of Lord Hanuman
कारण, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात हा बजरंगबलीचा अपमान असल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत या निवडणुकीत बजरंगबली हाही मोठा मुद्दा बनला होता. त्यामुळेच निवडणुकीचा ट्रेंड आणि निकाल पाहता नेते हनुमानाच्या दर्शनाला पोहोचले आहेत. बजरंगबलीला राग येऊ नये आणि विजयाचा आशीर्वाद मिळावा हीच त्यांची इच्छा असावी.
#WATCH | As counting of votes begins for #KarnatakaPolls, CM Basavaraj Bommai visits Hanuman temple in Hubballi. pic.twitter.com/isXkxoa79D — ANI (@ANI) May 13, 2023
#WATCH | As counting of votes begins for #KarnatakaPolls, CM Basavaraj Bommai visits Hanuman temple in Hubballi. pic.twitter.com/isXkxoa79D
— ANI (@ANI) May 13, 2023
मुख्यमंत्री बोम्मई हुबळी येथील हनुमान मंदिरात पोहोचले. येथे हनुमानाच्या दर्शनासोबतच त्यांनी मंदिरातील गर्भगृहाची प्रदक्षिणाही केली. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री बोम्मई यांनी हुबळीच्या विजयनगरमध्ये कार्यकर्त्यांसोबत हनुमानाच्या चालीसाचे पठण केले होते.
आज कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी ने शिमला स्थित प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिर में पूजा-अर्चना कर देश की सुख-समृद्धि की प्रार्थना की। pic.twitter.com/IlTXdYAtjN — Congress (@INCIndia) May 13, 2023
आज कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी ने शिमला स्थित प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिर में पूजा-अर्चना कर देश की सुख-समृद्धि की प्रार्थना की। pic.twitter.com/IlTXdYAtjN
— Congress (@INCIndia) May 13, 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड आणि निकाल पाहता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही बजरंगबलीच्या दर्शनाला पोहोचल्या आहेत. प्रियंका गांधी हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथे प्रियंका गांधींनी जाखू मंदिरात हनुमानताचे दर्शन घेतले. येथे पक्षाच्या विजयासाठी त्यांनी जाखू बाबांचे आशीर्वादही घेतले. या निवडणुकीत काँग्रेसने आतापर्यंत बाजी मारली आहे. पक्ष पूर्ण बहुमताने विजयी होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App