Karnataka Election : भाजपाने जाहीर केली ४० स्टार प्रचारकांची यादी; पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डा, राजनाथ सिंह यांची नावं आघाडीवर!

Karnataka elections

नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हिमंता सरमा, देवेंद्र फडणवीसांच्याही नावाचा आहे समावेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरला आहे. भारतीय जनता पार्टीने सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांच्याही नावाचा आहे समावेश. Karnataka Election BJP announced the list of 40 star campaigners

भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपाने या यादीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचाही समावेश केला आहे.

स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी यांचे पहिले नाव –

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, राजनाथ सिंह आणि अमित शहा हे दिग्गज कर्नाटकात प्रचार करणार आहेत. या यादीत पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असून त्यानंतर जेपी नड्डा, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांचे नाव आहे. तर, नितीन गडकरी यांचे नाव यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

या नेत्यांच्या नावांचा समावेश –

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत बीएस येडियुरप्पा यांचे नावही आघाडीवर आहे. यानंतर नलिन कुमार कटील, सीएम बसवराज बोम्मई, प्रल्हाद जोशी, डीव्ही सदानंद गौडा, केएस ईश्वरप्पा, गोविंद करजोल, आर अशोक, निर्मला सीतारामन स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुखभाई मांडविया, के अन्नामलाई, अरुण सिंग, डीके अरुणा, अरुण सिंह, डीके अरुणा, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान, हिमंता बिस्वा सरमा, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

Karnataka Election BJP announced the list of 40 star campaigners

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात