विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – हरिद्वार येथील धर्मसंसदेमध्ये मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक समुदायाविरोधात कथित धार्मिक गुरूंनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला असताना आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचले आहे.Kapil sibbal bats against Dharmsansad
या वक्तव्यांना आक्षेप घेणारी जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल झाली असून त्याबाबत सुनावणी घेण्याची तयारी देखील न्यायालयाने दर्शविली आहे.ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी हा विषय सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्यासमोर मांडला.
सिब्बल म्हणाले की,‘‘ आता आपण वेगळ्या देशामध्ये जगत आहोत जिथे आपल्या देशाचे बोधवाक्य बदलून ते ‘सत्यमेव जयते’ ऐवजी ‘शस्त्रमेव जयते’ असे झाले आहे.हरिद्वारमधील धर्मसंसदेप्रकरणी अनेकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले
असले तरीसुद्धा कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. हे सगळे उत्तराखंडमध्ये घडले आहे. तुम्ही हस्तक्षेप केल्याशिवाय कोणतीही कृती होणार नाही.पत्रकार कुरबान अली आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अंजनाप्रकाश यांनी याबाबतची याचिका सादर केली होती.
हरिद्वारमधील धर्मसंसदेत करण्यात आलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत त्याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App