विशेष प्रतिनिधी
कानपुर : टीम इंडियाचा गोलंदाज कुलदीप यादव याने शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्याने लस घेतानाचा फोटो शेअर करत लस घेण्याचे आवाहन देखील केले. मात्र हा फोटो समोर आल्यानंतर कुलदीपला लसीकरणासाठी गेलेली व्हिआयपी ट्रीटमेंट यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.Kanpur Administration order inquiry Cricketer kuldeep yadav take Corona Vaccine At Guest House
त्याच्यासाठी या VIP ट्रिटमेंटची कानपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होणार आहे.
जब भी मौका मिले तुरंत टीका लगवाएं। सुरक्षित रहें क्योंकि covid19 के खिलाफ लड़ाई में एकजुट होने की आवश्यकता है 🙏🏻 pic.twitter.com/6YSHyoGmWM — Kuldeep yadav (@imkuldeep18) May 15, 2021
जब भी मौका मिले तुरंत टीका लगवाएं। सुरक्षित रहें क्योंकि covid19 के खिलाफ लड़ाई में एकजुट होने की आवश्यकता है 🙏🏻 pic.twitter.com/6YSHyoGmWM
— Kuldeep yadav (@imkuldeep18) May 15, 2021
कुलदीप यादव याला कानपूरमधील गोविंदनगर येथील जागेश्वर हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस टोचण्यात येणार होती. मात्र त्याने लस घेतानाचा जो फोटो टाकला आहे ते कानपूर नगर निगम गेस्ट हाऊसचा आहे. कोरोनाची लस ही रुग्णालयात किंवा अधिकृत सेंटरवरच मिळते मग कुलदीप यादवसाठी लस गेस्ट हाऊसवर कशी आणली गेली असा सवाल केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील रुग्णालयात जाऊन लस घेतली आहे.मग कुलदीप यादवसाठी प्रोटोकॉल का तोडण्यात आले याचा सध्या तपास सुरू आहे. जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांनी अपर जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना .या प्रकरणी लवकरात लवकर रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App