विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे दोघेही काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आहेत. यातल्या कन्हैया कुमारने भारतीय कम्युनिस्ट पक्ष पक्षाकडून (CPI) लोकसभेची निवडणूक लढवली आहे. तरी तो त्या पक्षात का नाराज आहे? त्याला नेमके काय हवे आहे?, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. Kanihya Kumar is about to leave CPI and join congress
भारतीय कम्युनिस्ट पक्षातील काही नेत्यांच्या मते कन्हैया कुमारच्या अपेक्षा त्याच्या राजकीय शक्तिपेक्षा जास्त आहेत. त्याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिहारचे प्रदेशाध्यक्षपद हवे आहे किंवा पक्षाच्या उमेदवार निवडीच्या समितीचे राष्ट्रीय अध्यक्षपद हवे आहे. ही दोन्ही पदे कन्हैया कुमारच्या मूलभूत शक्ती बाहेरची आहेत. कन्हैया कुमार विद्यमान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या विरोधात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चार लाख मतांनी हरला आहे, याकडे पक्षाचे नेते लक्ष वेधतात.
याखेरीज कोणताही कम्युनिस्ट पक्ष हा अशा पद्धतीने कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी पडलेला इतिहास नाही. कम्युनिस्ट पक्षाची निर्णयप्रक्रिया पद्धतीच्या दबावाचा राजकारणातून चालत नाही. कन्हैया कुमार जरी कार्ड होल्डर नेता असला तरी त्याला कम्युनिस्ट पक्षाची कार्यपद्धती पुरेशी माहिती नाही. त्यातूनच त्याने पक्षात आपल्या अटी – शर्ती राखून काम करण्याचे योजले होते. परंतु अशा अटी – शर्ती कम्युनिस्ट पक्षात चालत नाहीत आणि त्याला हे त्याला माहिती नसल्याने तो नाराज आहे असे दिसते, असे त्यांनी सांगितले.
आपले राजकीय भवितव्य कम्युनिस्ट पक्षात सुरक्षित नाही. आपल्याला हवे तसे काम या पक्षात राहून करता येणार नाही. आपल्याला हवी असलेली पदे ते देत नाहीत. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्याने कन्हैया कुमारने पक्ष सोडून आपल्या अटी – शर्ती चालतील, असा काँग्रेस पक्ष निवडला असे समजते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App